शाळेत जाण्यापूर्वी आणि नंतर...या फोटोग्राफरने मुलांचं आयष्य कसं बदललं पाहा !!

शिक्षण हा मुलांचा मुलभूत हक्क आहे. प्रत्येक मुलाला शिक्षण हे मिळालंच पाहिजे, पण काही मुलांना शिकण्याच्या वयातच मजुरी करावी लागते. दोन वेळच्या अन्नाची चिंता नसलेल्या वयात त्यांना काम केलं तरच दोन वेळचं अन्न मिळणार असतं. या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून अनेक संस्था, समाजसेवक काम करत असतात. बांगलादेशमधल्या GMB Akash नावाच्या फोटोग्राफारने देखील बालमजुरांना शाळेत पाठवण्याची मोहीम हाती घेतली आहे. तो मुलांच्या आईवडिलांची परवानगी घेऊन जमेल तेवढ्या मुला-मुलींना शाळेत पाठवण्याचं काम करतो. फोटोग्राफर असल्याने त्याने मुलांचं शाळेत जाण्यापूर्वीचं आणि नंतरचं रूप कॅमेऱ्यात टिपलंय.
आजच्या लेखातून आपण आकाशने टिपलेल्या या लहानग्यांच बदललेलं रूप पाहणार आहोत. मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्हालाही आनंद देऊन जाईल.
