computer

५ महिने बेपत्ता असलेले पोलीस हवालदार चक्क या ठिकाणी सापडले ??

आपल्याकडे एक म्हण आहे “काखेत कळसा अन गावाला वळसा”..... आज आम्ही जी बातमी सांगणार आहोत ती याच म्हणीवर आधारलेली आहे. जास्त वेळ न दवडता बातमीकडे वळूया.

उत्तर प्रदेशच्या बिजनौर, बढापूर येथील कंवर पाल सिंग हे हवालदार महिनाभराच्या सुट्टीवर होते. सुट्टी संपून तब्बल ५ महिने झाले तरी ते कामावर परतलेच नाहीत. मग त्यांच्याविरुद्ध चौकशी बसवण्यात आली. चौकशीत जे समोर आलं त्याने सगळेच आवाका झाले.

कंवर पाल सिंग हे तिहार जेल मध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगताना आढळले आहेत राव. आता ते तिहार जेल मध्ये कसे पोहोचले हे समजून घेऊया.

१९८७ साली हाशीमपुरा हत्याकांड झालं होतं. या हत्याकांडाला जबाबदार असलेले UP Provincial Armed Constabulary पथकात कंवर पाल सहभागी होते. ऑक्टोबर २०१८ साली हत्याकांडात सहभागी असलेल्या १५ जणांना शिक्षा ठोठावण्यात आली. कंवर पाल यांनी २२ नोव्हेंबर २०१८ साली आत्मसमर्पण केलं. या तारखेच्या १ आठवडापूर्वीच त्यांनी सुट्टी घेतली होती. म्हणजे हे महाशय आपल्या वरिष्ठांना न कळवताच गुपचूप सुट्टी घेऊन शिक्षा भोगायला गेले.

राव, आता असा प्रश्न पडतो की एवढं सगळं होई पर्यंत उत्तर प्रदेशच्या पोलिसांना खबर कशी नव्हती ?

या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसलं तरी एका प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ शकतो.  हाशीमपुरा हत्याकांड काय आहे या प्रश्नाचं उत्तर खालील लेखात जाणून घ्या.

हाशिमपुरा हत्याकांड : कशाप्रकारे एका धाडसी पत्रकारामुळे ४२ जणांच्या खुनाचा छडा लागला ?