computer

पब्जी परत येणार, पण कसं ? वाचा पूर्ण बातमी !!

पब्जी बंद झाल्यापासून कित्येकांचा हिरमोड झालेला आपण पाहत आहोत. एका रडणारा मुलगा पब्जी बंद झाल्यावर आपल्या आईला "इथे परिस्थिती काये" सांगतानाचा व्हिडीओ देखील महाराष्ट्रभर वायरल झाला. कालच बंगालमध्ये पब्जी बंद झाल्यामुळे एका मुलाने आत्महत्या केल्याची बातमी देखील आली. अर्थात यापूर्वीही पब्जीच्या वेडात बऱ्याच जणांनी प्राण गमावल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेतच. या सर्वांवरून आपल्या देशात पब्जीने लोकांना किती वेड लावलं आहे हे लक्षात येतं.

पब्जी चाहत्यांसाठी मात्र आता एक खुशखबर आली आहे. पब्जी भारतात परत येण्याची शक्यता आहे. पब्जी भारतासारखे मोठे मार्केट सहजासहजी हातातून जाऊ देणार नाही. यासाठी पब्जीने मोठा निर्णय घेत चीनच्या टेंसेंट कंपनीसोबतची भारतातील भागीदारी संपविण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण कोरियन कंपनी पब्जी कॉर्पोरेशन यांच्याद्वारे पब्जीचा कारभार पाहिला जातो. कुठल्या देशात कुणासोबत भागीदारी करायची हा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. यामुळे भारत सरकारने ज्या कारणामुळे पब्जी बंद केले, त्यापासून पब्जीला दूर जाता येणार आहे.

पब्जी चाहत्यांनी पब्जी परत यावे यासाठी गेले काही दिवस देव पाण्यात घातले आहे. त्यांची इच्छा आता पूर्ण होईल असे दिसत आहे. पब्जी चाहत्यांना कदाचित लवकरच पुन्हा 'विनर विनर चिकन डिनर' ची मजा अनुभवता येणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required