computer

२० रुपयांची नवीन नोट आली आहे भाऊ....काय खास आहे या नोटेत ??

मंडळी, भारतातल्या प्रत्येक नोटेचा मेकओव्हर झाला आहे. फक्त एकच नोट उरली होती, ती म्हणजे २० रुपयांची नोट. आता ती पण बदलणार आहे राव. ही बघा नवी कोरी २० रुपयाची नोट.

कालच रिझर्व बँकेने याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. नव्या २० रुपयाच्या नोटेचा रंग हा पोपटी असेल. समोरच्या बाजूला मधोमध महात्मा गांधीचा फोटो असेल. मागच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात स्वच्छ भारत अभियानाचा लोगो पण असणार आहे. या नव्या नोटेवर सध्याचे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची सही असेल.

खरं आकर्षण आहे मागच्या बाजूचं चित्र. प्रत्येक नव्या नोटेवर भारतातल्या महत्वाच्या स्थळाचं चित्र असतं. २० रुपयाच्या नोटेसाठी वेरुळच्या लेण्यांची निवड झाली आहे. वेरूळ येथील कैलाश मंदिराचा प्रसिद्ध खांब नोटेच्या मागच्या बाजूला दिसत आहे.

मंडळी, २० रुपयाच्या नोटेचा हा मेकओव्हर तुम्हाला आवडला का ?? नवी नोट कशी वाटली ते नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required