computer

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी जिओनं आणलंय स्वदेशी ॲप! Zoom ॲपला टक्कर देणार!

कोरोनामुळं लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी, तसंच ऑनलाईन क्लासेस घेणाऱ्यांसाठी झूम, गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स, अशा वेगवेगळ्या व्हिडीओ कॉनफरन्सिंग ॲप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. यात भर म्हणून‌ आता जिओनं स्वतःचं 'जिओमीट' हे 'मेड इन इंडिया' व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ॲप लॉन्च केलंय. 

JioMeet ॲप हे ॲन्ड्रॉईड, Windows, MacOs आणि iOS या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला ते इन्स्टॉल करता येईल. या ॲपमधून तुम्ही एका व्यक्तीशी व्हिडीओ कॉल करू शकता किंवा एकाच वेळी १०० लोकांसोबत HD व्हिडीओ कॉन्फरन्स कॉल होस्ट करू शकता. मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे तुम्हाला या ॲपवर Sign Up करता येईल. झूम ॲपसारखंच इथेही मिटींग आयडी किंवा पर्सनल लिंक नेम वापरून तुम्हाला मिटींग जॉईन करायची आहे.

JioMeet वरती तुम्ही एका दिवसात कितीही  वेळा कॉन्फरन्स कॉल होस्ट किंवा जॉईन करू शकता. झूम ॲपवरती एका कॉलसाठी ४० मिनिटांची मर्यादा आहे. पण जिओमिट ॲपचा कॉल २४ तासापर्यंत चालू शकतो. इथे आधीच मिटींग शेड्युल करून इतर सदस्यांना आमंत्रित करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. प्रत्येक मिटींग ही पासवर्डने सुरक्षित असते आणि 'वेटिंग रूम' पर्याय वापरून होस्ट हव्या त्याच व्यक्तींना मिटींगमध्ये प्रवेश देऊ शकतो. 

तुम्हीही हे ॲप वापरून बघा आणि कंमेटमध्ये तुमचं मत नोंदवा...

सबस्क्राईब करा

* indicates required