computer

ठगाची जबानी : खऱ्याखुऱ्या ठगाची खरीखुरी थरारक कथा....फक्त बोभाटाच्या वाचकांसाठी !!

माया महा ठगनी हम जानी।।
तिरगुन फांस लिए कर डोले
बोले मधुरे बानी।।

अर्थात: मधुर वाणीने भुलवून त्रिगुणांच्या फासात अडकवून ठगणार्‍या -ठगवणार्‍या, फसवणार्‍या, अडकवणार्‍या  मायेला आम्ही ओळखून आहोत.

आपल्यापैकी बर्‍याचजणांनी ही संत कबीराची रचना वाचलीही असेल. 

वाचकहो, 'बोभाटा' येत्या काही दिवसांत एक कादंबरी तुमच्यासमोर क्रमशः उलगडून दाखवणार आहे. ती आध्यात्मिक ठकवण्याची कहाणी नाही, तर  खर्‍याखुर्‍या एकेकाळी वास्तवात असलेल्या ठकवण्याची कहाणी आहे.

या कादंबरीचे नाव आहे 'ठगाची जबानी'! कर्नल मेडोज टेलर या ब्रिटीश अधिकार्‍याने १८३९ साली लिहिलेल्या या कादंबरीचे मराठीत रुपांतर वा.शि.आपटे यांनी केले. १९७४ साली ही कादंबरी सरिता प्रकाशनाच्या सौ. मंदाकिनी भावे यांनी प्रकाशित केली. 

एकाच वेळी आश्चर्य आणि भीती निर्माण करणारी ही कादंबरी म्हणजे अमीरअली नावाच्या ठगाचे आत्मकथन आहे. 'बोभाटा'ने ही कादंबरी क्रमशः स्वरुपात प्रकाशित करण्याचा मनसुबा 'वरदा प्रकाशन ' यांच्याकडे मांडल्यावर  काही शर्ती आणि अटींसोबत ही कादंबरी बोभाटाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्याची परवानगी वरदा प्रकाशन यांनी दिली. आम्ही त्यांचे आभारी आहोत. या कामात श्री रविप्रकाश कुळकर्णी आणि श्री हेमंत रायकर यांचे बहुमोलाचे सहकार्य आम्हाला मिळाले. बोभाटा त्यांचे आभारी आहे.

आता काही खास सूचना आमच्या वाचकांसाठी : या कादंबरीचे प्रत्येक प्रकरण बोभाटाच्या संकेतस्थळावर फक्त चार दिवस वाचायला मिळेल. त्यानंतर ते अप्रकाशित करण्यात येईल. मूळ पुस्तकाचे मुखपृष्ठ श्री. विश्वनाथ घैसास यांनी रेखाटले होते. या व्यतिरिक्त 'बोभाटा'वरची इतर रेखाटने 'बोभाटा'चे मित्र श्री कुमार मोरे यांनी तयार केली आहेत. या पुस्तकाचे सर्व हक्क मूळ प्रकाशकांकडे सुरक्षित आहेत.

तर वाचकांनो लवकरच वाचू या 'ठगाची जबानी'!!

सबस्क्राईब करा

* indicates required