computer

अंतराळात सामोसा? ब्रिटनमधल्या भारतीय रेस्टॉरंटच्या मालकाने काय प्रयोग केलाय पाहा !!

आजकाल 'व्हायरल व्हिडीओ' हा शब्द अगदी रोजचाच झालाय! काही व्हिडिओमध्ये खरंच काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात त्याचं कौतुकही वाटतं. पण काही व्हिडिओ पाहून धक्काच बसतो. कारण प्रसिद्धी साठी कोणाच्या डोक्यात काय कल्पना असतात हे कोणी सांगू शकत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झालाय. ब्रिटनमधील एका भारतीय रेस्टॉरंटच्या मालकाने चक्क सामोसा अंतराळात पाठवलाय. 

ही बातमी म्हणजे एखादा जोक वाटेल पण हे प्रत्यक्षात घडलंय. नीरज गधेर यांचे ब्रिटनच्या बाथ भागात 'चायवाला' नावाचे भारतीय रेस्टॉरंट आहे. त्यांनी सामोसा पॅक करून हेलियम फुग्याच्या सहाय्याने हा प्रयोग करायचे ठरवले. पण हा सामोसा अंतराळात पोहोचण्याच्या आधीच क्रॅशलॅंड झाला. 

नीरज गधेर यांनी हा प्रयत्न याआधीही दोनवेळा केला होता. त्यानी हेलियम फुग्याला सामोसा ठेवलेला बॉक्स बांधला. त्याच्याबरोबर एक हेलियम गो प्रो कैमरा आणि जीपीएस ही जोडले. पण त्यांचे हे दोन्ही मिशन अयशस्वी झाले. पहिल्यांदा त्यांच्या हातून हेलियम फुगा निसटला तर दुसऱ्या वेळी फुग्यामधला हेलियम गॅस संपला. जेव्हा त्यांना हा प्रयोग करण्यामागचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की एक गंमत म्हणून हा प्रयोग केला. एक दिवशी सहज त्यांनी मित्रांना सांगितले की ते अंतराळात सामोसा पाठवणार आहेत. त्यांचे हे बोलणे ऐकून खुपजणं हसले. मग त्यांनी ठरवलं या प्रयोगाने आनंद पसरवता येईल आणि ते प्रयोगाला लागले.

हा फुगा या वेळी बराच लांब उडाला. आधी जीपीएसच्या संपर्कात होता, पण नंतर संपर्क तुटला. परिणामी हा बॉक्स फ्रान्समध्ये जाऊन पडला. नीरज आणि त्यांच्या मित्रांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली की हा सामोसा कोणाला प्रत्यक्ष जाऊन शोधता आला तर पहा. त्यांच्या आवाहनाला क्सेल मॅथॉन (AxelMathon) यांनी कमेंट केली व त्यांनी प्रत्यक्ष जाऊन तो फुगा शोधला. पण सामोसा सोडून त्यांना बाकीच्या सर्व गोष्टी सापडल्या. त्यांनी प्रत्यक्ष फोटोही नीरज यांना पाठवला.

नीरज आणि त्यांच्या मित्रांना हा पूर्ण उडता प्रवास रेकॉर्ड करायचा होता. पण ते शक्य झाले नाही. तरीही त्यांनी लॉंगचिंगचा केलेला व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केला आणि तो तुफान व्हायरल झाला आहे.

केवळ गंमत म्हणून केलेला प्रयोग अनेक लोकांना हसवून गेला. आता असे प्रयोग करणारे अजून बरेच व्हिडिओ यूट्यूबवर येतील आणि कोण कशा कल्पना लढवतील हे काही सांगता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं?

सबस्क्राईब करा

* indicates required