computer

जगभरात भारतीयांची संख्या पाहून थक्क व्हाल...हा अहवाल काय सांगतो पाहा!!

काही मोजके देश सोडले तर भारतीय हे जगभर पसरलेले आहेत. हे मोजके देश कोणते ते जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख वाचा.

“जगातल्या या २ देशांमध्ये एकही भारतीय नाही...या देशांची नावं तुम्हाला नक्कीच माहित नसतील !!”

तर, विषय असा आहे की या जगभर पसरलेल्या भारतीयांची संख्या नेमकी किती आहे याचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे बघून तुम्हाला नक्कीच वाटेल की भारताबाहेरही एक भारत अस्तित्वात आहे. चला तर हे आकडे आणि अहवाल पाहूया.

परराष्ट्र खात्याने दिलेल्या अहवालानुसार तब्बल १.३६ कोटी भारतीय भारताबाहेर वास्तव्य करून आहेत. रिझर्व बँकेचा हवाला देत परराष्ट्र खात्याने म्हटलं आहे, की भारताबाहेर राहणाऱ्या नागरिकांनी २०१८ ते २०१९ या एका वर्षात तब्बल ७.६४ कोटी डॉलर्स भारतात पाठवले आहेत. २०१९ ते २०२० आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर या काळात तब्बल ४१९० कोटी डॉलर्स भारतात आले आहेत.

जगभरात कोणत्या देशात सर्वाधिक भारतीय आहेत हे आता जाणून घेऊ या.

UAE – ३४.२ लाख

सौदी अरेबिया – २५.९ लाख

अमेरिका – १२.८ लाख

कुवेत – १०.३ लाख

ओमान – ७.८ लाख

कतार – ७.६ लाख

नेपाळ – ५ लाख

UK – ३.५ लाख

सिंगापूर – ३.५ लाख

बहरीन – ३.२ लाख

हा अहवाल आणखी काय सांगतो?

२०१५ ते २०१९ च्या अखेरपर्यंत  १२५ वेगवेगळ्या देशांमधून २१,९३० भारतीयांच्या अस्थी भारतात आणण्यात आल्या आहेत. हे काम आपल्या देशाच्या कन्सुलर, पासपोर्ट आणि व्हिसा (CPV ) विभागातर्फे केलं जातं. CPV विभाग मृतांच्या कुटुंबियांच्या संपर्कात राहतात. मृत व्यक्तीला भारतात पाठवणे किंवा जिथे मृत्यू झाला तिथे अंत्यसंस्कार करणे. हे करत असताना कुटुंबियांच्या सल्ल्यानुसार सर्व विधी केले जातात. याखेरीज काही प्रकरणांमध्ये ‘भारतीय समुदाय कल्याण निधी’ अंतर्गत आर्थिक मदतही केली जाते.

सबस्क्राईब करा

* indicates required