व्हिडीओ ऑफ दि डे : आयआयटी पवईमध्ये चक्क एक गाय शिकायला गेली आहे....व्हिडीओ पाह्यला का ?

मंडळी, सध्या गायींचे अच्छे दिन सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही ना काही कारणांमुळे गायींच्या बातम्या चालू असतातच राव!! मध्यंतरी वरुण ग्रोवरचा गायींवरचा एक कॉमेडी व्हिडियो चांगलाच गाजला होता.
आता पण पुन्हा गाय चर्चेत आली आहे राव!! पण यावेळी कारण थोडं वेगळं आहे. आयआयटी म्हटले म्हणजे तिथे देशभरातून सगळ्यात हुशार मुलं शिकायला येतात. पण तिथे चक्क एक गाय शिकायला गेली राव!!
तर मंडळी विषय असा आहे की, आयआयटी पवईमध्ये सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळात झाला आहे राव!! आयआयटीत लेक्चर सुरु असताना अचानक एक गाय वर्गात घुसली आणि शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. नंतर जसेतसे या गायीला वर्गाच्या बाहेर काढण्यात आले. या सगळ्या सर्कशीचा वीडियो चांगलाच वायरल झाला आहे.
मंडळी आयआयटी पवईच्या कॅम्पसच्या आजुबाजुला अनेक भटकी जनावरे फिरत असतात. त्यांचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास पण होत असल्याचे मानले जात आहे. त्यातच आता थेट गाय वर्गात घुसल्याने हा मुद्दा समोर आला आहे.
मंडळी, याआधी पण एका बैलाने विद्यार्थ्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यावेळी प्रशासनाने आम्ही काहीतरी उपाययोजना करू असे सांगून वेळ मारून नेली होती. त्यातच आयआयटीतले काही प्राणिप्रेमींनी या बैलांना पकडून नेताना विरोध केला होता. आता पुन्हा त्याचप्रकारची घटना घडल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. आम्ही अभ्यास करायचा की जनावरांपासून स्वताला वाचवत फिरायचे असे प्रश्न सध्या ते विचारत आहेत. अनेकांना आयआयटीच्या बाहेर पडण्याची सुद्धा भीती वाटत आहे राव!! या जनावरांचा लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
मोकाट जनावरांकडून होणार त्रास वाढत असल्याने भविष्यात काही मोठी दुर्घटना व्हायच्या आधी यांच्यावर उपाययोजना व्हायला हवी ही त्यांची खूप आधीपासूनची मागणी आहे.
तुमच्यापण शाळा-कॉलेजात अशी मोकाट फिरणारी कुत्री-मांजरे होती का हो? असल्यास त्या खास विद्यार्थ्यांचा फोटो आज कमेंटबॉक्समध्ये टाकाच..