हा चोर या कारणामुळं फक्त मंगळवारी चोरी करतो...

राव, आज आम्ही गोष्ट सांगणार आहोत अशा चोरांची जे फक्त मंगळवारी चोरी करायचे. आणि हो, रात्री नाही बरं का. दिवसाढवळ्या !!! चला ‘मंगळवारच्या चोरांची’ कथा वाचूया.

मोहम्मद समीर खान आणि त्याचा साथीदार मोहम्मद शोएब हे दोघे फक्त मंगळवारी चोरी करायचे आणि तेही दिवसाढवळ्या. या दोघांनी तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक भागात चोरी करून तब्बल २१ लाख रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारला होता.

स्रोत

या दोघांची भेट झाली ती जेल मध्ये. मग दोघांनी हातमिळवणी केली. दोघे मोटारसायकलीवरून चोरी करण्यासाठी घर शोधायचे. बंद पडलेलं घर दिसलं की यांच्यातला एकजण जाऊन टाळा तोडायचा तर दुसरा बाहेर वाट बघत उभा राहायचा. हाती जे लागेल ते घेऊन दोघेही १० मिनिटात फरार व्हायचे. अशा प्रकारच्या चोरीच्या त्यांच्यावर ३० पेक्षा जास्त केसेस होत्या. 

मंडळी, या डोकेबाज चोरांना शेवटी पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केलंच. दोघे फक्त मंगळवारीच का चोरी करायचे याचं गुपित पोलिसांनीच उघड केलंय.

प्रातिनिधिक फोटो (स्रोत)

त्याचं असं आहे, मोहम्मद समीर खान हा डोळ्यांनी अधू असल्याने त्याला फक्त दिवसाच काम करता यायचं. त्यामुळे ते दिवसाढवळ्या चोरी करायचे. राहिली गोष्ट मंगळवारची तर मोहम्मद समीर खानची अशी (अंध)श्रद्धा होती की मंगळवारी चोरी केल्याने त्याचं नशीब अचानक फळफळेल. 

अंधश्रद्धेने लेकाला डायरेक्ट जेलची हवा खायला लावली राव.

सबस्क्राईब करा

* indicates required