computer

व्हिडीओ ऑफ दि डे : ऐन लग्नात लॅपटॉप घेऊन बसणारी कामसू सुनबाई बघितली का ?

कोरोनाने आजवर एवढया अभूतपूर्व गोष्टी घडवल्या आहेत की आता काही घडले तरी विशेष वाटत नाही. तशी इंटरनेटवर रोजच काहीतरी अचंबित करणाऱ्या घटनांचे चित्रविचित्र व्हिडिओज यायची लाट आली आहे. आता असाच एक व्हिडिओ वायरल होत आहे. तो बघून तुम्हाला आश्चर्य पण वाटेल आणि हसूसुद्धा येईल.

झाले असे की एक लग्न सुरू होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना. लोकांचे लक्ष वधुकडे गेले. वधू काय करत होती? तर बाई चक्क लॅपटॉवर काम करत होत्या. आता स्वतःच्या लग्नात कोण काम करतं? स्वतःच लग्न म्हटलं म्हणजे वेगळाच मान असतो. अशावेळी इतर गोष्टींना रजा दिली जाते. पण या कामसू बाईंचं कामावर मात्र खूपच प्रेम असावे किंवा मग ऑफिसचा दबाव असावा. कारण काहीही असले तरी व्हिडीओ मात्र चांगलाच वायरल झाला आहे.

हा व्हीडीओला एक युजरने ट्विटरवर टाकला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी म्हटले आहे की, ज्यांना वाटत आहे आपल्यावर कामाचं खूप प्रेशर आहे, त्यांनी हा व्हिडीओ बघावा. व्हिडीओ जोरात वायरल झाला. त्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियासुद्धा येत आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required