computer

व्हिडीओ ऑफ दि डे : ही गाय तर फुटबॉल खेळून राह्यली ना राव.....व्हिडीओ पाह्यला का ?

मंडळी, भारतात फुटबॉल क्रिकेट एवढा प्रसिद्ध नाही. आता बघा ना, फुटबॉलर्सची नावं विचारली तर रोनाल्डो आणि जास्तीतजास्त मेस्सी शिवाय फारसं कोणतं नाव आपल्याला आठवणार नाही. हे तर काहीच नाही, फुटबॉल मध्ये पायाने बॉल मारून गोल केला जातो यापलीकडे आपल्याला फारसं माहित नसतं.

भारतात फुटबॉल असा यथातथाच असताना एक गाय मात्र फुटबॉल मध्ये भलतीच पारंगत झाली आहे. या गाईचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला का ?

मंडळी, व्हिडीओ च्या सुरुवातीला वाटतं की गाईने बॉल नुसताच अडवून धरला आहे, पण नंतर ती एखाद्या कसलेल्या फुटबॉलरसारखी बॉलला खेळवते.  व्हिडीओच्या शेवटी तर ती चक्क बॉलला फॉलो करताना दिसत आहे. हे कसं घडलं याला उत्तर नाही. व्हिडीओत दिसणारी गाय ही रस्त्यांवर फिरणारी सामान्य गाय दिसत आहे. याचा अर्थ गायीनेच मुलांचा रोजचा खेळ बघून तो शिकून घेतला असावा.

राव, व्हायरल व्हिडीओचं मूळ कधीच सापडत नाही. या व्हिडीओबद्दल पण माहिती समजलेली नाही. एवढं मात्र खरं की हे गोव्यात घडलंय. ज्यांनी हा व्हिडीओ शेअर केला त्यांना तो whatsapp वर फॉरवर्ड होऊन आला होता. इंटरनेटवर आल्यानंतर तो लगेच व्हायरल झाला.

तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला गायीचा फुटबॉल प्लेअर अवतार ? आम्हाला नक्की सांगा !!