computer

ज्वालामुखीचा स्फोट कधी एवढ्या जवळून पाहिलाय का? व्हिडीओ पाहून घ्या !!

कधी जिवंत ज्वालामुखी फुटलेला पहिला आहे काय? नुकताच आइसलँडमधील ज्वालामुखीचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतोय. हा व्हिडीओ ड्रोनद्वारे घेण्यात आलेला आहे. फुटणाऱ्या ज्वालामुखीचा एवढ्या जवळून घेतलेला व्हिडीओ तुम्हाला एक वेगळाच अनुभव देऊन जाईल. एकदा पाहून घ्याच.

आइसलँडमधील ज्वालामुखीचे ड्रोन फुटेज ब्लॉगर ब्योर्न स्टेनबेक यांनी पोस्ट केले आहेत. लाल सूर्याचा गोळा जणू वितळून वाहत येतोय असा भास होतो हा व्हिडीओ बघून होतो. रिकॅनेस द्वीपकल्पातील फॅग्राल्डस (Fagradals) पर्वतावर या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. आईसलँड हवामान कार्यालय (आयएमओ) च्या माहितीनुसार १९ मार्च रोजी सकाळी ८.४५ वाजता हा स्फोट सुरू झाला. उद्रेक होण्याच्या काही तासांपूर्वी १.२ किमीजवळ ३.१ रिश्टर स्केलचा भूकंपही झाला होता.

विस्फोटामुळे ग्रिंदाविक या शहराच्या लोकांना धोका नव्हता. पण जवळच्या शहरातील लोकांना घरातच राहण्याची सूचना करण्यात आली होती. विस्फोटानंतर ४ तासांनी हा लाव्हा एका नदीप्रमाणे पुढे पुढे सरकत खूप मोठ्या परिसरात म्हणजे जवळपास २०० फुटबॉल मैदानाएवढ्या परिसरात पसरला. व्हिडीओत हा सर्व परिसर लालेलाल व केशरी रंगात दिसत असल्याचं तुम्ही पाहूच शकता.

आयएमओने स्फोट होण्यापूर्वी काही अविश्वसनीय दृश्ये शेअर केली, तसेच सोशल मीडियावर ब्युरन स्टेनबेक यांनी पोस्ट केलेले व्हीडीओ आणि फोटो खूप वेगाने पसरले व नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले. तुम्हाला कसा वाटला हा व्हडिओ?

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required