computer

व्हिडीओ ऑफ दि डे : वारली आदिवासी रॅप करून काय सांगतोय ऐकलंत का?

मंडळी, गली बॉय सिनेमात एका रॅपचं नाव आहे ‘असली हिपहॉप से मिलाये हिंदुस्तान को’. याच ओळीला जागून आज आम्ही एक अस्सल मुंबईच्या मातीतला रॅप घेऊन आलोय. हा रॅप व्यथा मांडतोय माणसाने विकासाच्या नावावर चालवलेल्या जंगल तोडीची’. चला हा रॅप ऐकुया.

या बँडचं नाव आहे स्वदेशी बँड. हा एक बहुभाषिक बँड आहे. स्वदेसी आणि आरे कॉलनी वाचवण्यासाठी काम करणारे प्रकाश भोईर आणि ‘आरे कलेक्टिव्ह’ यांनी मिळून जनजागृतीसाठी हा नवीन रॅप तयार केलाय. या रॅपचं नाव आहे The Warli Revolt म्हणजे ‘वारली विद्रोह’. 

आरे कॉलनी परिसरातल्या जंगलाचा होणारा नाश या विषयाभोवती हा रॅप फिरतो. यातून अनेक प्रश्न मांडण्यात आले आहेत. रॅपची सुरुवात होते वारली लोकांच्या इतिहासापासून. सुरुवातीच्या या ओळी पाहा.

मी तो वारली आदिवासी
आमच्या पद्धती हायत ऐतिहासिक
ह्या रानाचा मुल रहिवाशी
जीव आणतो पडसर मातीत

या ओळीतून इतिहासाचा संदर्भ देऊन मग रॅप वळतो आजच्या परिस्थितीकडे. रॅप स्पष्ट शब्दात सांगतो की नफ्यासाठी केला गेलेला हा ‘खोटा विकास’ आहे. याविरुद्ध विद्रोह करून उठा. त्या लोकांसाठी लढा ज्यांना आवाज नाही, त्या लोकांसाठी लढा ज्यांना त्यांच्याच जमिनीवरून हाकलून देण्यात आलं. 

मंडळी, आरे कॉलनीचा प्रश्न हा नेहमी चर्चेत राहणारा विषय आहे. याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

आरे कॉलनी भागात असलेला वन्य परिसर हा मुंबईच्या उत्तर उपनगरातील एकमेव वन्य भाग आहे. या भागात आजही वारली आदिवासी लोक राहतात. पण लवकरच वारली लोकांचं घर आणि त्यांचा रोजगार सुटण्याच्या वाटेवर आहे. कारण या भागात ‘डेव्हलपमेंट’साठी जंगलतोड केली जात आहे. वन्य भाग मुळापासून नष्ट केला जातोय. अशात पूर्वापार राहत असलेल्या वारली लोकांचं काय असा प्रश्न उद्भवतो.

मंडळी, तुम्हाला हा रॅप कसा वाटला आम्हाला नक्की कळवा !!

सबस्क्राईब करा

* indicates required