computer

कुत्रे गाडीच्या मागे का धावतात ? गुगलने सांगितलेली ही उत्तरं पटतात का पाहा !!

चालत्या गाडीच्या मागे पळणे ही कुत्र्यांची आवडती सवय असते. चालत्या गाडीसोबत त्यांची काय दुष्मनी असते काय माहीत? पण त्यांची सात जन्माची दुष्मनी असेल असा पाठलाग करतात. अनेकांना यामागे काय कारण असेल असा प्रश्न नेहमी पडत असेल, आम्हाला पण पडला. गुगलवर त्याचा शोध घेतल्यावर गुगलने जी कारणे सांगितली ती तुमच्यासमोर आणत आहोत...

1)

मंडळी कुत्र्यांचा स्वभाव हा आक्रमक असतो. त्यांना चॅलेंज दिलेले आवडत नाही, जेव्हा एखादी गाडी जास्त स्पीडने त्यांच्यासमोर गेली की मग त्यांना असे वाटते की गडी मला चॅलेंज देतोय. मग चॅलेंज स्वीकारत तुमच्याशी स्पर्धा करतात. तुम्ही जर गाडी हळू केली तर कशी जिरवली या आनंदात ते पण माघारी फिरतात.

2)

कुत्रे जेवढे आक्रमक असतात तेवढेच ते भित्रे सुद्धा असतात राव!! जेव्हा कुणी त्यांच्या पुढून जोरात गाडी घेऊन जातो तेव्हा ते घाबरतात आणि मग सेल्फ डिफेन्ससाठी ते गाडीच्या मागे पळतात. जेव्हा तुम्ही गाडी हळू करता तेव्हा त्यांना हिंमत येते व ते तुमच्यापासून दूर जातात.

3)

कुत्र्यांचा एरिया ठरलेला असतो, आणि आपल्या एरियात दुसरा कुत्रा त्यांना सहन होत नाही. जसा कुत्रा सहन होत नाही, तशी दुसरी गाडी पण त्यांना सहन होत नाही. जर एखादी गाडी आपल्या एरियामधील नाही हे त्यांना समजले की ते मग भुंकायला सुरुवात करतात. 

4)

अपघातांमध्ये कुत्रे मरण्याचे प्रमाण खूप आहे. जेव्हा एखाद्या अपघातात एखादा कुत्र्याचा नातेवाईक मरतो, तेव्हा त्याच्या मनात गाडीबद्दल राग निर्माण होतो व गाड्यांमध्ये फरक करता येत नसल्याने कुठलीही गाडी दिसली की ते भुंकायला आणि त्या गाडीमागे पळायला सुरवात करतात.

5)

मंडळी कुत्र्यांची सुसु करण्याची आवडती जागा म्हणजे गाड्यांचे टायर! हे काय नविन सांगण्याची गरज नाही. जेव्हा एखादी गाडी समोरून जाते तेव्हा त्यांना वाटते की आपली हक्काची सुसू करण्याची जागा कुणीतरी हिसकावून घेत आहे. मग याच गोष्टीचा राग धरून ते गाडीचा पिछा पुरवतात राव!!

कुत्र्यांचे गाडीमागे पळण्याचे तुम्हाला पण एखादे कारण माहीत असेल तर कमेंटबॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा...

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required