computer

या गावात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला अपेंडिक्स काढून टाकणे बंधनकारक का आहे?

कोणालाही परदेशी जायचे असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? व्हिसा, पासपोर्ट होय ना? व्हिसा पासपोर्ट शिवाय इतरही काही कायदेशीर कागदपत्रे लागतात. काही देशांत त्यांच्या नियमानुसार लस घेणेही आवश्यक असते. पण असा कुठला देश तुम्ही ऐकला आहे का? जिथे प्रवेश घ्यायचा असेल तर शरीराचा अवयव काढणे आवश्यक आहे. धक्का बसला ना? पण हे खरंच आहे. हा नियम फक्त मोठ्यांनाच आहे असं नाही तर, लहान मुलांनाही पाळणं बंधनकारक आहे.

हा देश आणि तिथल्या अजब कायद्यामागचं कारण जाणून घेऊया !!

अंटार्क्टिकात व्हिलास लास एस्ट्रेलास (Villas Las Estrellas) हे गाव वसलं आहे. या गावात चिली देशातील लोक राहतात. अनेकजण जगातील कानाकोपऱ्यातून या गावात येत असतात. खास करून ज्यांना तिथे काही दिवस मुक्काम करायचा आहे अशांसाठी तिथे एक कडक नियम आहे. तिथे जाण्यापूर्वी शस्त्रक्रिया करून अपेंडिक्स हा अवयव काढून टाकणं बंधनकारक आहे. मानवाची उत्क्रांती झाली आणि अपेंडिक्सचा उपयोग संपला, पण हा भाग अजूनही आपल्या शरीरात आहे. त्याचा त्रास झाला तर जीवावर बेतू शकतं. लगेच उपचार घेतले तर हा धोका टाळता येऊ शकतो, पण अंटार्क्टिकातील या गावाची गोष्ट थोडी वेगळी आहे. 

व्हिलास लास एस्ट्रेलास गावातील तापमान हाडे गोठवणारं असतं. अशावेळी अपेंडिक्सचा अगदी साधा आजारही जीवावर बेतू शकतो  तिथलं सर्वांत जवळचं हॉस्पिटलही किंग जॉर्ज आयलंडमध्ये म्हणजे जवळजवळ एक हजार किलोमीटर अंतरावर आहे. त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याचा रस्ताही खूप ओबडधोबड आणि डोंगराळ आहे. बर्फाळ वातावरणामुळे खूपदा तो बंदही असतो. तसेच तिथे सर्जन डॉक्टरही जास्त नाहीत. तिथे अद्ययावत वैद्यकीय सुविधा नाहीत. त्यामुळे अपेंडिक्सचे दुखणे अचानक सुरू झाले तर जीव जाण्याची भीती आहे. यापूर्वी तिथे अश्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला. लहान मुलांनाही तो लागू आहे.

हा विचित्र नियम पाहिल्यास कोणाला खरंच तिथे जायची इच्छा होईल का? तुम्हाला काय वाटतं?

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required