computer

चेन्नई सुपर किंग्सने सामना गमावला असला तरी या गोष्टींमुळे त्यांनाच फायदा झाला आहे....

चेन्नई सुपर किंग्सने परवा सिजनचा पहिलाच सामना खेळला आणि त्यांना पराभव बघावा लागला. सुरुवात टॉस हारण्यापासून झाली. नंतर कॅप्टन धोनी पण शून्यावर आऊट होऊन परतला. एका बाजूने बघायला गेले तर याला नामुष्कीच म्हणावे लागेल. पण याच सामन्यात घडलेल्या काही गोष्टींमुळे उलट चेन्नईला दिलासा मिळाला आहे. 

बिचारे चेन्नई समर्थक पराभवाने चांगलेच निराश झाले आहेत. पण आम्ही आज ज्या गोष्टी सांगणार आहोत त्या वाचून चेन्नई समर्थकांची सगळी निराशा दूर होणार आहे. 

परवाच्या सामन्यात जरी दिल्लीच्या शिखर धवन आणि पृथ्वी शॉने चेन्नईच्या बॉलर्सना वाईट धुतले असेल तरी चेन्नईच्या सुरेश रैनाच्या फिफ्टीने मात्र विरोधकांना धडकी भरवली आहे. जर पुढील सामन्यात चिन्ना थाला चांगला चालला तर चेन्नईसाठी सामना पलटवण्याची क्षमता ठेवून आहे. चौथ्या नंबरवर येऊन देखील १५०च्या स्ट्राईक रेटने रैनाने बॅटिंग केली. कदाचित तो रनआऊट झाला नसता तर चेन्नईची धावसंख्या अजून वाढली असती.

मागच्या सिजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कडून खेळलेला मोईन अली यंदा चेन्नईच्या गोटात सामील झाला आहे. धोनी ज्यांच्यात क्षमता आहे त्यांचा वापर करून घेण्यात हुशार आहे. परवाच्या सामन्यात ज्या पद्धतीने मोईन अलीचा धोनीने वापर केला त्यावरून ही गोष्ट पुन्हा सिद्ध झाली. तिसऱ्या नंबरवर बॅटिंगसाठी पाठवलेल्या मोईन अलीने २४ बॉल्सवर ३२ धावांची धुलाई करत रैनाला चांगली साथ दिली. 

डवेन ब्राव्हो या धोनीचा हुकमी एक्का आहे. ऑल राऊंडर ब्राव्होला बॅटिंग मिळाली नाही. बॉलिंग पण धोनीने शेवटी शेवटी दिली. ज्या शार्दूल ठाकूरवर धोनीने विश्वास ठेवला त्याने दोनच ओव्हर्समध्ये 31 धावा दिल्या. पण ब्राव्होने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त धावा दिली. तसेच पुढील ओव्हरमध्ये जम बसलेल्या पृथ्वी शॉला आऊट केले. एकीकडे चेन्नईचे बॉलर्स धुतले जात होते तर ब्राव्होने मात्र बाजू सावरून धरली होती.

तर चेन्नई समर्थकांनो परवाचा सामना जरी चेन्नई हरली असेल तरी हा ट्रायल सामना समजून चला. कारण, ज्या गोष्टी या सामन्यात समोर आल्या आहेत त्यांची योग्य तो वापर धोनीने केला तर यंदा गुलाल तुमच्यापासून दूर राहणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required