बेचा पाढा येत नाही म्हणून नवरीने लग्न का मोडलं?...कुठे घडलाय हा प्रकार ?

अरेंज मॅरेज म्हणलं की सगळं कसं पारखून घेतलं जातं. म्हणजे कुंडली जुळवली जाते, वय,रूप, आर्थिक स्थर, जात-पात हे सगळं लग्नाआधीच बघून घेतलं जातं. मुला मुलीची पसंती झाली की पूर्ण घरातल्या लोकांचीही मनजुळणी होते. अरेंज मॅरेज म्हणजे सगळं प्लॅंनिंग प्रमाणेच होतं. पण उत्तर प्रदेशात अशी एक गडबड झालीये की नवऱ्याच्या घरच्यांना तोंड लपवण्याचा वेळ आलीये. ऐन लग्नात माळ घालण्याआधी काही मिनिटं राहिली असताना नवरा मुलीने लग्न मोडलं. कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल.
हे घडलंय उत्तर प्रदेशातील महोबा येथे. शनिवारी संध्याकाळी नवरा आणि त्याचे पाहुणे वाजत गाजत हॉलला पोहोचले. नवरीच्या मनात नवऱ्याच्या शिक्षणाविषयी शंका असल्याने तिने मांडवात त्याला बेचा पाढा म्हणायला लावला. नवरा मुलगा गडबडला. तो बेचा पाढाही नीट म्हणू शकला नाही. त्याला म्हणताच आला नाही. झालं मग, मुलीने भर मांडवात लग्नाला नकार दिला. सगळ्यांनी तिला समजावले, पण ठाम राहिली. तिचे म्हणणे असे की, "मुलगा काही शिकला नाही. त्याने शिक्षण लपवले आहे, कदाचित तो शाळेतही गेला नसावा."
शेवटी पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी तक्रार न नोंदवता दोन्ही बाजूच्या लोकांना पैसे,दागिने, गिफ्ट्स एकमेकांना परत करायला लावले. आणि पुढे कोणताही गोंधळ न होता लग्न मोडलं.
अशी ही मोडलेल्या लग्नाची गोष्ट. अशा विचित्र कारणाने लग्न मोडल्याचं तुमच्या पाहण्यात आलंय का? असा एखादा भन्नाट किस्सा असेल तर आम्हाला नक्की सांगा !!
लेखिका: शीतल दरंदळे