computer

एकाच ओव्हरमध्ये ६ चौकार मारणारे ५ धुरंधर !!

पृथ्वी शॉ या नवोदीत खेळाडूने आपला करिष्मा दाखवत एकाच ओव्हरमध्ये ६ चौकार मारून नवीन विक्रम केला. पृथ्वी शॉ पुढचा सचिन म्हणून ओळखला जातो. गेले काही दिवस त्याच्यावर बरीच टीका झाली पण शेवटी त्याने सर्वांना दखल घ्यायला मात्र भाग पाडले. 

एकाच ओव्हरमध्ये ६ षटकार मारणारे जसे अनेक खेळाडू आहेत तसेच एकाच ओव्हरमध्ये ६ चौकार मारणारे देखील आहेत. सलग चौकार मारणे हे सलग षटकार मारण्यापेक्षा कठीण समजले जाते. पृथ्वी शॉ हा सलग ६ चौकार मारणारा पहिला नाही, त्याआधी देखील अनेकांनी हा विक्रम केला आहे. अशाच ५ बॅट्समनबद्दल आज आपण जाणून घेऊया.

१. संदीप पाटील

मराठामोळा संदीप पाटील आपल्या धडाकेबाज बॉलिंगसाठी ओळखला जातो. त्याने मारलेला बॉल थेट समुद्रात जाऊन पडला होता ही गोष्ट देखील अनेकांना माहीत आहे. त्याच्या भात्यात एकाहून एक अशा शॉट्सचा भरणा असे. १९८२ साली इंग्लंडविरुद्ध खेळताना त्याने १२९ धावांची खेळी करत सामना वाचवला होता. या खेळीत त्याने तब्बल १८ चौकार मारले होते. त्यात बॉब विलिसच्या बॉलिंगवर एकाच ओव्हरमध्ये मारलेल्या ६ चौकारांचा देखील समावेश आहे.

२. ख्रिस गेल

गेल जसा सिक्सर किंग आहे तसा चौकार मारण्याच्या विक्रमात देखील त्याचा समावेश आहे. २००४ साली इंग्लंडविरुद्ध खेळताना त्याने मॅथ्यू होगार्डच्या बॉलिंगवर हा पराक्रम केला होता. 

३. रामनरेश सारवान

वेस्ट इंडीजचा हा बॅट्समन आपल्या धुवांधार बॅटिंगसाठी ओळखला जातो. त्याच्या बॅटिंगचा तडाख्यात आपला मुनाफ पटेल देखील सापडला होता. २००६ साली भारताविरुद्ध खेळताना त्याने मुनाफ पटेलच्या एकाच ओव्हरमध्ये ५ चौकार मारले होते.

४. सनथ जयसूर्या 

सनथ जयसूर्या हा श्रीलंकेचा महान खेळाडू वनडे आणि टेस्ट अशा दोन्ही खेळांमध्ये अतिशय भक्कमपणे बॅटिंग करत असे. जयसूर्याच्या करियरच्या शेवटच्या काळात २००७ साली त्याच्या या बॅटिंगचा अनुभव इंग्लंडच्या अँडरसनला आला होता. अँडरसनने पूर्ण ओव्हरमध्ये खूप जोर लावूनही जयसूर्याने ६ चौकार मारले होते.

५. अजिंक्य रहाणे

संदीप पाटील नंतर दुसरा मराठी खेळाडू अजिंक्य रहाणे याने एकाच ओव्हरमध्ये 6 चौकार मारले होते. 2012 सालच्या आयपीएलमध्ये त्याने ही कामगिरी केली होती. बँगलोरचा बॉलर श्रीनाथ अरविंदच्या बॉलिंगचे तीन तेरा वाजवत त्याने हा पराक्रम केला होता.

 

क्रिकेटबद्दल अशी आणखी कोणती माहिती तुम्हांला वाचायला आवडेल हे आम्हांला जरूर कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required