computer

आता भांडायला माणसं भाड्यावर मिळणार ? काय आहे चीनची नवी योजना ??

मंडळी, युद्धात ज्यांचं प्रत्यक्षात भांडण असतं ते कधीच आपापसात लढत नाहीत. त्यांच्या वतीने त्यांची सेना लढते. या झाल्या असामान्य लोकांच्या गोष्टी. सामान्य जनतेला मात्र स्वतःहूनच भांडावं लागतं. सध्या चीन मध्ये यावर पण उपाय शोधण्यात आलाय. Taobao ही चायनीज ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट आता लोकांना “प्रोफेशनल भांडखोर” पुरवणार आहे. तुम्ही बरोबर ऐकलं राव “प्रोफेशनल भांडखोर’ पण असतात.

चीनच्या अलिबाबा या बलाढ्य कंपनीचं एक लेकरू म्हणजे Taobao कंपनी. ही कंपनी चीन मध्ये ऑनलाईन शॉपिंगची सेवा पुरवते. आता त्यांनी एक नवीन पाऊल टाकलंय. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे Taobao आता लोकांना भांडणासाठी माणसं उपलब्ध करून देणार आहे.

चीनच्या रेड स्टार नावाच्या एका वृत्तवाहिनीने ही सर्व्हिस कशी काम करते याचा पत्ता लावला. रेड स्टारने दिलेल्या माहितीनुसार ५ ते २०० चायनीज युआन देऊन तुम्ही “प्रोफेशनल भांडखोर” भाड्यावर घेऊ शकता. भारतीय चालानाप्रमाणे ५० रुपये ते २०५० रुपये द्यावे लागतील.

मंडळी, हे पैसे कामानुसार आकारले जाणार आहेत. म्हणजे लोकांना फोनवर भांडून हवं आहे की मेसेज द्वारे यावर हे ठरेल. तसेच भांडण कशावरून करायचं आहे, मुद्दा काय असेल, कितीवेळ भांडण करून हवं आहे हे सगळे मुद्दे लक्षात घेतले जातील. हे सोप्पं व्हावं म्हणून Taobao कडून सर्व्हिसेसची यादी पण दिली जाईल.

राव, हा वेडेपणा वाटत असेल तर थोडं लोकांना प्रतिक्रिया पण बघून घ्या. लोकांना ही आयडिया आवडलेली दिसत आहे. चीन मध्ये सध्या “Substitute Arguing Service” हा हॅशटॅग ट्रेंडींग आहे. कदाचित लवकरच “प्रोफेशनल भांडखोर” अशी जॉब प्रोफाईल पण निघेल. पण असो....

तर मंडळी, भारतात असं काही सुरु झालं तर तुम्हाला सर्व्हिस घ्यायला आवडेल का ??

सबस्क्राईब करा

* indicates required