ट्रायने लागू केलेत नवीन टेरिफ प्लॅन्स...मराठी चॅनेल्ससाठी मोजावे लागणार तब्बल एवढे पैसे !!!

आजपासून टेरिफ प्लॅन्स मध्ये महत्वाचा बदल होणार आहे. “टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया”च्या (ट्राय) नवीन नवीन नियमांनुसार तुम्हाला जे चॅनेल्स पहायचे आहेत तेवढ्याचेच पैसे द्यावे लागतील. हे सगळ्या प्रकारच्या ऑपरेटर्सना लागू होणार आहे.
नवीन नियमानुसार अवघ्या १३० रुपयांमध्ये फ्री टू एअर असणारे १०० चॅनेल्स पाहता येतील. यात DD चे सर्व चॅनेल्स आणि abp न्यूज, 9X आणि TV9 च्या चॅनेल्सचा समावेश असेल. तुम्हाला जर १०० पेक्षा अधिक चॅनेल्स पहायचे असतील तर दर २० चॅनेल्ससाठी २५ रुपये अधिक द्यावे लागतील. यात जर पेड चॅनेल्सचा समावेश असेल तर चॅनेल्सचे ठरलेले दर यात समाविष्ट होतील. हे दर जास्तीत जास्त १९ रुपयांपर्यंत असतील. या दारात १८% GST पण लागू होणारा आहे.
मराठी चॅनेल्ससाठी नक्की किती रुपये मोजावे लागतील ते आता पाहूया.
१. झी मराठी

१९ रुपये + १८ टक्के जीएसटी = एकूण २२.४२ रुपये
झी मराठी HD
१९ रुपये + १८ टक्के जीएसटी = एकूण २२.४२ रुपये
२. झी टॉकीज

१७ रुपये + १८ टक्के जीएसटी = एकूण २०.०६ रुपये
झी टॉकीज HD
१९ रुपये + १८ टक्के जीएसटी = एकूण २२.४२ रुपये
३. झी युवा

१० रुपये + १८ टक्के जीएसटी = एकूण ११.८० रुपये
५. कलर्स मराठी
१५ रुपये + १८ टक्के जीएसटी = एकूण १७.७० रुपये
कलर्स मराठी HD
१९ रुपये + १८ टक्के जीएसटी = एकूण २२.४२ रुपये
६. स्टार प्रवाह
९ रुपये + १८ टक्के जीएसटी = १०.६२ रुपये
स्टार प्रवाह HD -
१५ रुपये + १८ टक्के जीएसटी = १७.७० रुपये