computer

या ४ ठिकाणी लाईव्ह पाहा 'चांद्रयान-२'च्या लँडिंगचा ऐतिहासिक क्षण !!

इस्रोची महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-२' मोहीम शेवटच्या टप्प्यात आहे. ७ सप्टेंबर रोजी चांद्रयान चंद्राच्या भूमीवर पाऊल ठेवणार आहे. इस्रोने या मोहिमेसाठी चंद्राच्या दक्षिणेचा भाग निवडला आहे. या भागात आजवर कोणत्याच देशाने आपलं यान पाठवलं नव्हतं. त्यामुळे ही मोहीम यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी इस्रोवर आहे.

भारतीयांसाठी आनंदाची बातमी अशी की हा ऐतिहासिक क्षण तुम्ही लाईव्ह पाहू शकता. लाईव्ह पाहण्याचे काय काय मार्ग आहेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

२२ जुलैला मोहीम अवकाशात झेपावली तेव्हा इस्रोने अधिकृत वेबसाईटवरून थेट प्रक्षेपण केलं होतं. ७ तारखेला जेव्हा यान चंद्रावर पोहोचेल तेव्हा सुद्धा अधिकृत वेबसाईटवरून थेट प्रक्षेपण केलं जाईल. त्यासाठी इस्रोच्या https://www.isro.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

दुसरा मार्ग आहे युट्युबचा. ‘प्रेस इन्फर्मेशन ब्युरो’तर्फे (PIB) युट्युबवर या घटनेचं थेट प्रक्षेपण होणार आहे. यासाठी PIB च्या या युट्युब चॅनेलला भेट द्या. याखेरीज हॉटस्टारवर तुम्हाला लाईव्ह पाहता येईल.

मंडळी, जर लाईव्ह बघता येणार नसेल तरी टेन्शन घेऊ नका. इस्रोच्या ट्विटर अकाऊंटवर प्रत्येक मिनिटाचं अपडेट पाहता येणार आहे.

सगळं समजलं असेल तर अता वेळ पण लक्षात ठेवा. ‘चांद्रयान-२’ अपरात्री १.३० आणि २.३० वाजेच्या दरम्यान चंद्राच्या भूमीवर उतरणार आहे. पुढच्या काही तासांनी म्हणजे सकाळी ५.३० ते ६.३० वाजेच्या दम्यान यानातील रोव्हर चंद्राच्या जमिनीवर उतरेलेला असेल.

तर मंडळी, हा महत्वाचा क्षण लाईव्ह बघायला विसरू नका. इतरांना समजावं म्हणून पोस्ट शेअर करायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required