computer

जगातला सर्वात धोकादायक डायव्हिंग स्पॉट-जेकब विहिर!! नक्की कशामुळे ती धोकादायक समजली जाते हे तर वाचा!!

आता शहरीकरणामुळे विहिरी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्या तरी ग्रामीण भागात विहिरी अजूनही जिवंत आहेत. या विहिरीशी निगडित लहानपणी अनेक आठवणी असतात. तिथले पाणी काढणे, त्यात पोहायला शिकणे, उड्या मारणे अश्या कितीतरी गोष्टी आपण केल्या असतील. साधारणतः आपण पाहिलेली विहीर ही किती खोल असते? साधारण ३०फूट, ४० किंवा ६० फूट असू शकते. पण आज आम्ही अशा विहिरीबद्दल सांगणार आहोत जी तब्बल १३० फुटांपेक्षा जास्त खोल आहे. त्या विहिरीचा तळ अजूनतरी कोणाला सापडला नाही. त्या जगप्रसिद्ध विहिरीचे नाव आहे, जेकब विहीर (Jacob's well).

ही विहीर आहे अमेरिकेत. सेंट्रल टेक्ससमध्ये विंबर्ले शहराच्या बाहेर ही विहिर आहे. ही विहिर मुळात नैसर्गिक आहे आणि ती खूप खोलही आहे. अर्थातच हा लोकांचा एक लोकप्रिय डायव्हिंग स्पॉट आहे. अनेक साहसी पोहणारे इथे विहिरीत सूर मारण्याचा आनंद लुटायला येतात. साहजिकच आतापर्यंत अनेकजणांनी इथे जीवही गमावला आहे. खूप जण खाली डुबकी मारल्यावर हरवले आहेत, पण हे ठिकाण कितीही धोकादायक असले तरी दरवर्षी उन्हाळ्यात इथे गर्दी जमतेच जमते. विहिरीत काहीजण पूर्ण स्क्युबा डायव्हिंगची उपकरणे वापरून उतरतात, तर काहीजण तशीच उडी मारतात. इथे सूर मारणे हा तिथला एक लोकप्रिय साहसी खेळ आहे.

ही विहीर आहे अमेरिकेत. सेंट्रल टेक्ससमध्ये विंबर्ले शहराच्या बाहेर ही विहिर आहे. ही विहिर मुळात नैसर्गिक आहे आणि ती खूप खोलही आहे. अर्थातच हा लोकांचा एक लोकप्रिय डायव्हिंग स्पॉट आहे. अनेक साहसी पोहणारे इथे विहिरीत सूर मारण्याचा आनंद लुटायला येतात. साहजिकच आतापर्यंत अनेकजणांनी इथे जीवही गमावला आहे. खूप जण खाली डुबकी मारल्यावर हरवले आहेत, पण हे ठिकाण कितीही धोकादायक असले तरी दरवर्षी उन्हाळ्यात इथे गर्दी जमतेच जमते. विहिरीत काहीजण पूर्ण स्क्युबा डायव्हिंगची उपकरणे वापरून उतरतात, तर काहीजण तशीच उडी मारतात. इथे सूर मारणे हा तिथला एक लोकप्रिय साहसी खेळ आहे.

२० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापासून पाणबुड्यांनी आणि पट्टीच्या पोहणाऱ्यांनी जेकबच्या विहिरीचा शोध घेतला आहे. १९३० च्या दशकात पोहणारे आणि सूर मारणारी जनता इथे पोहण्यासाठी हेल्मेट वापरत असे. तेव्हा ते हेल्मेट तयार करण्यासाठी दुधाची बादली आणि रबरी नळी वापरायचे. २००० पासून व्यावसायिक स्क्युबा डायव्हर्सनी या विहिरीचा खोलवर शोध घेण्यास सुरुवात केली. २००७ मध्ये याचा एक नकाशा बनवण्यात आला. त्यामुळे आतली रचना कशी आहे याचा अंदाज आला. जेकबच्या विहिरीची आतली रचना खूप अवघड आहे. तिथे अनेक वळण आणि खडकाची तीक्ष्ण टोकं आहेत.त्यामुळे त्या निमुळत्या भागातून जाणे अवघड जाते. स्क्युबा उपकरणं लावल्यास काही भागात ऑक्सिजन सिलिंडर काढून ठेवावे लागतात कारण सिलिंडर्ससह आत जाण्यासाठी जागाच नसते. अनेकदा कुठे आहोत याचा अंदाज लागत नाही. त्यामुळे काहीजणांचा ऑक्सिजन संपून मृत्यू झाला आहे. बऱ्याचदा पाणबुड्यांना मानवी सांगाडेही सापडले आहेत. अंधार असल्याने टॉर्च हरवल्यास अडचणी आल्या आहेत.

जेकबच्या विहिरीवरची एक घटना २०१५ मध्ये घडली होती. २१ वर्षाच्या डिएगो ॲडमने या विहिरीत मृत्यू अगदी जवळून अनुभवला होता. ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्डही झाली होती. व्हिडिओमध्ये ॲडम कोणत्याही ऑक्सिजनशिवाय जेकबच्या विहिरीत डुबकी मारताना दिसतो. तो तेव्हा विहिरीच्या काठाशी पोहचू शकला पण त्यात त्याने एक फ्लिपर गमावला. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने तो अजून १०० फूट खाली सरकला. फ्लिपर गमावल्याने त्याला पृष्ठभागावर पोहणे खूप कठीण झाले होते. त्याने मागे वळून इतरांना इशारा देण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तो कोणालाही कळलाच नाही.आणि त्यात एक भिंतीला धक्का लागल्याने ॲडमने टॉर्च ही गमावला. पण ॲडम न घाबरता या कठीण प्रसंगी शांत राहिला. न घाबरल्याने त्याला श्वास नियंत्रित ठेवायला मदत झाली. त्याने लगेचच वजन कमी करण्यासाठी अंगावरचा बेल्ट कापलाआणि हळूहळू मार्ग काढत तो पृष्ठभागावर आला. सुदैवाने ॲडम या प्रसंगातून वाचला.

जेकबच्या विहिरीवर वर्षभरात कमीतकमी डझनभर मृत्यू झाल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे या विहिरीला जगातला सर्वात धोकादायक डायव्हिंग स्पॉट म्हणून ओळखले जाते. विहिरीच्या खोलीमुळे काही अवशेष वर्षानुवर्षे सापडले नाहीत. परंतु धोके असूनही, जेकबची विहिरी एक लोकप्रिय डायव्हिंग स्पॉट आहे. शेवटी गूढ गोष्टींचे माणसाला जास्त आकर्षण असते हेच खरं.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required