computer

दिवाळखोरीत गेलेले क्रिकेटपटू: खेळाची मोठी नावे जे पटकन श्रीमंत ते गरीब झाले.

क्रिकेट म्हणजे चाळीशीच्या आत श्रीमंत होऊन निवृत्ती घेणे आणि त्यानंतरची कमेंटेटर किंवा प्रशिक्षक होऊन पैसे कमवणे एकाअर्थी क्रिकेटमध्ये करियर झाले. मग पैशांची काही ददात पडत नाही असाच एक सर्वसाधारण समज आहे. पण असेही काही खेळाडू होते त्यांना आर्थिकदृष्ट्या वाईट दिवस बघावे लागले होते. काही खेळाडूंची उदाहरणे आज आपण वाचणार आहात.

ख्रिस केर्न्स

न्यूझीलँड क्रिकेटमधील टॉप ३ खेळाडूंमधील एक म्हटला जाणारा ख्रिस केर्न्स २०१३ साली मॅच फिक्सिंगमध्ये अडकला आणि त्याचा वाईट काळ सुरू झाला. त्याला मिळालेल्या जाहिराती, अनेक करार सगळे त्याच्याकडून काढून घेण्यात आले. तसेच कायदेशीर बाबीत अडकल्यामुळे त्याला मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास झाला. पुढे त्याने आपल्या बायकोचा इव्हेंट मॅनेजमेंटचा बिजनेस बघण्यास सुरुवात केली. त्यासाठी तो ऑस्ट्रेलियाला निघून गेला. याच वर्षी त्याला मोठा हार्ट ऍटॅक येऊन गेला. त्यातून तो आता हळूहळू सावरत आहे.

मॅथ्यू सिनक्लेर

आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात २१४ धावा काढून जगाचे लक्ष वेधून घेणारा सिनक्लेर आपला फॉर्म टिकवू शकला नाही. पुढे २०१३ साली त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सेल्समॅन म्हणून तो काम करू लागला. कुठलीही क्वालिफिकेशन नसल्याने त्याला काम देखील मिळत नव्हते. २०१७ साली तो आपल्या मुलांना घेऊन पळून गेला. नंतर एका रेस्टॉरंटमध्ये तो सापडला.

ऍडम हॉलीओक

इंग्लंडचा हा ऑल राऊंडर खेळाडू १९९९ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन ऑस्ट्रेलियाला आपला फॅमिली बिजनेस सांभाळण्यासाठी निघून गेला. या बिजनेसमध्ये त्याने सुरुवातीला मोठा फायदा मिळवला. पण २००८ च्या जागतिक मंदीत त्याचा बिजनेस बुडाला. २०११ साली त्याने आपली दिवाळखोरी जाहीर केली. पुढे त्याला आपल्या उदरनिर्वाहासाठी शिक्षक म्हणून काम करावे लागले.

ग्राहम पोलाक

दक्षिण आफ्रिकेसाठी २३ कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून आपली छाप सोडणारा पोलाक कॅन्सर आणि पार्किन्सनचा शिकार झाला. एकवेळ तर अशी आली की या जेष्ठ क्रिकेटरला दक्षिण आफ्रिका क्रिकेट मदत करत नाही म्हणून त्यांना आयपीएल फ्रँचायजींकडून मदत मागावी लागली होती.

पॉल स्ट्रॉंग

झिम्बाब्वे क्रिकेटचा आघाडीचा बॉलर असलेला स्ट्रॉंग आपल्या गुगलीने अनेकांना चकवा देत असे. पण त्याला कायदा मोडला म्हणून तुरुंगात मुक्काम करावा लागला. या गोष्टीचा मोठा आर्थिक फटका त्याला बसला. २०१० साली त्याने या विषयी बोलताना सांगितले की मला क्रिकेटर होण्याआधी हिमालयात जाऊन संन्यासी व्हायचे होते, पण आमच्या देशाची जमीन गेली म्हणून मी कायदा मोडण्यास भाग पडलो.

खेळात करियर करायचे असेल तर साहजिकच अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. पण पुढे खेळातही चमकले नाहीत तर शिक्षन नसल्याने हे लोक इतर क्षेत्रांत काही करु शकत नाहीत हेच या उदाहरणांवरून दिसून येते!!

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required