इतरांना सोडून डास तुम्हालाच का चावतात जाणून घ्यायचंय? मग हे वाचाच..

छान मोकळ्या हवेत गप्पा मारायला बसले असता डास तुम्हाला हैराण करून सोडतात का? अशा वेळेस या डासांचा इतका राग येतो. आणि त्यात जर हे डास सोबतच्या लोकांच्या जवळही फिरकत नाहीत आणि आपल्याला सळो की पळो करून सोडतात तेव्हा तर अगदी संताप होतो. कुणी म्हणतं,"तुमचं रक्त गोड आहे, म्हणून डास तुमच्याकडे आकर्षित होतात". 

काय आहे डास विशिष्ट व्यक्तींकडेच आकर्षित होण्याचं कारण?

अमेरिकेतल्या कीटक सोसायटीचे प्रवक्ते असलेल्या कीटकशास्त्रज्ञ असलेल्या जॉन एडमन यांच्या मते काही लोकांच्या उत्सर्जनांत युरिक ऍसिडसारख्या आम्लांचं प्रमाण अधिक असतात. अशा पदार्थांचे वास डासांना त्या व्यक्तींकडे आकर्षित करतात. आणखी एक कीटकशास्त्रज्ञ रिच पोलॉक म्हणतात- "प्रत्येक व्यक्ती उष्णतेसोबतच कार्बन मोनॉक्साईड आणि इतर घटकपदार्थांचे मिश्रण उत्सर्जित करत असते. परंतु या मिश्रणाचं प्रमाण व्यक्तीपरत्वे वेगवेगळं असतं आणि त्यामुळे डास लोकांकडे कमी अधिक प्रमाणात हल्ला करतात. तसेच एका प्रकारच्या डासांच्या माद्यांना अधिक आकर्षित करणारी व्यक्ती डासांच्या इतर प्रजातींना तितकेच आकर्षित करू शकेलच असे नाही"

कित्येकदा डास आपल्याकडे आकर्षित होण्याचं एक कारण आपण शरीराला लावत असणारे मॉईस्चरायझर्सही असू शकतात. काही सौंदर्यप्रसाधनेदेखील डासांना वासाद्वारे त्यांच्याकडे खेचून घेतात. दुदैव असं की यावर आपण उपाय म्हणून डासांना पळवून लावणारं क्रीम लावलं तरी त्या क्रीमचा प्रभाव सौंदर्यप्रसाधनांपेक्षा कमी काळ राहतो. 

अर्थातच, जर तुम्ही डासांना आवडणारे असाल तर नक्कीच डासांच्या प्रादुर्भावामुळे होणार्‍या रोगांचे तुम्ही बळी ठरण्याची शक्यता अधिक तयार होते. त्यामुळे डासांना पळवून कसे लावावे याचे उपाय योजा आणि आपली काळजी घ्या. एक उपाय असाही असू शकतो तो म्हणजे आपल्यापेक्षा डासांना अधिक प्रिय असलेल्या व्यक्तींना घेऊनच बाहेर जाणे, काय? 

 

सबस्क्राईब करा

* indicates required