१० वर्षांत ५०० ही धावा न केलेल्या या पाकिस्तानी दिग्गजाने भारतीय खेळाडूंवर केली जोरदार टीका, त्यांचं म्हणणं काय आहे वाचलंत का?

पाकिस्तानी दिग्गज खेळाडू नेहमीच भारतीय खेळाडूंवर टीका करत असतात. हे दिग्गज खेळाडू भारतीय खेळाडूंची तुलना पाकिस्तानी खेळाडूंसोबत करून भारतीय खेळाडूंना कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतात. नुकताच ज्या माजी पाकिस्तानी खेळाडूने ३ भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे त्या खेळाडूला १० वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत ५०० धावांचा आकडा देखील पार करता आला नव्हता. तुम्हाला अंदाज आलाच असेल आम्ही कोणाबद्दल बोलतोय. डोक्याला जास्त ताण देण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही बोलतोय ते माजी पाकिस्तानी खेळाडू आकिब जावेद बद्दल (Aaqib javed) ज्यांनी रिषभ (Rishabh pant) पंत,विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराहवर (Jasprit bumrah) जोरदार टीका केली आहे.

आता जाणून घ्या, आकीब जावेद दिग्गज भारतीय खेळाडूंबद्दल काय म्हणाले. आकीब जावेद यांनी रिषभ पंत, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांची तुलना बाबर आजम, मोहम्मद रिजवान आणि शाहीन आफ्रिदी बरोबर केली आहे. तुलना केली इथपर्यंत ठीक होतं, परंतु आकिब जावेद यांनी भारतीय खेळाडूंना कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे.

आकिब जावेद यांनी म्हटले की, "भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली पेक्षा बाबर आजम खूप पुढे आहे. बाबर आजम सध्या यशाच्या शिखरावर आहे. तो क्रिकेटच्या तीनही स्वरूपातील सर्वोत्तम खेळाडू आहे. तर विराट कोहली सध्या संघर्ष करताना दिसून येत आहे. बाबर आजम सध्या आयसीसीच्या वनडे आणि टी२० क्रमवारीत टॉपच्या खेळाडूंमध्ये आहे. तसेच कसोटी क्रमवारीत तो टॉप ५ फलंदाजांमध्ये आहे."

तसेच ते पुढे म्हणाले की, "शाहीन शाह आफ्रिदी आयसीसीच्या गोलंदाजांच्या यादीत टॉप ५ मध्ये आहे. तरीदेखील तो जसप्रीत बुमराह पेक्षा उत्तम गोलंदाज आहे. " तसेच आकिब जावेद यांनी रिषभ पंतची तुलना मोहम्मद रिजवान सोबत करत म्हटले की, "रिजवान जबाबदारीने खेळतो रिषभ पंत अजूनही जबाबदारीने खेळत नाही."

आकिब जावेद यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की कळवा..

सबस्क्राईब करा

* indicates required