computer

रोनाल्डोने कोकाकोलाच्या बाटल्या बाजूला का केल्या? त्याने कोकाकोलाला किती मोठे नुकसान झाले आहे?

ख्रिस्तीयानो रोनाल्डो हा जगभरातील तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेला खेळाडू. गरिबीतून वर येऊन त्याने जगातला सर्वोकृष्ठ फुटबॉल खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलं आहे. रोनाल्डोला इन्स्टाग्रामवर जगात सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत. एवढ्या उंचीवर गेलेला हा माणूस आपल्या जगण्यातून मात्र नेहमीच शिकवण देत असतो. रक्तदान करण्यासाठी अंगावर टॅटू न काढणे असो की आपल्या फॅन्सना न टाळता त्यांना भेटने असो यामुळे तो उठून दिसतो. त्याचा फिटनेस देखील तसा कौतुकाचा विषय!

रोनाल्डो कुठल्याच अंगाने ३६ वर्षांचा वाटत नाही. २५ वर्षांचा खमका तरुण असल्या सारखी त्याची फिटनेस आहे. या फिटनेससाठी त्याने तशी मेहनत देखील घेतली आहे. बाहेरचे खाणे, कोल्ड्रिंक्स, फास्टफूड तो टाळत असतो. सध्या त्याचा या गोष्टींचा आग्रह किती मोठा आहे हे सिद्ध करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

त्याचं झालं असं, युरो चषक सुरू आहे. पोर्तुगाल आणि हंगेरी यांचा सामना सुरू होण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोनाल्डो आला. त्याच्या समोर कोकाकोलाच्या दोन बाटल्या ठेवल्या होत्या. आपल्या फिटनेस फ्रिक भावाला ते काय सहन झाले नाही. त्याने त्या बॉटल उचलल्या आणि बाजूला ठेवल्या. त्यानंतर त्याने पाण्याची बॉटल सर्वांसमोर धरून पाणी प्या असा संदेश दिला. गोष्ट तशी छोटी आहे. पण त्याची जगभर चर्चा होत आहे.

कोल्ड्रिंक्स किंवां फास्टफूडने तात्पुरता आनंद मिळत असला तरी या गोष्टी शरीरासाठी हानिकारक आहेत, हे रोनाल्डोने पुरते ओळखले आहे. तो मुलांच्या बाबतीतही कोल्ड्रिंक्स आणि फास्टफूडचे लाड पुरवत नाही. आता या व्हिडिओच्या माध्यमातून जगाला हाच संदेश दिला आहे. पण गोष्ट इथे संपत नाही. पठ्ठ्या रोनाल्डो आहे, त्याच्या कुठल्याही गोष्टीचे पडसाद उमटल्याशिवाय कसे राहतील? सोशल मिडियावर या घटनेची चर्चा रंगल्यावर तिकडे कोकाकोलाचे शेयर पडले. एवढे की कंपनीचे तब्बल ४ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

अशाप्रकारे रोनाल्डोने सकारात्मक संदेश दिला आणि लोकांनी पण त्याला उचलून धरले आहे. यानिमित्ताने आरोग्य आणि फास्टफूड हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय!!

सबस्क्राईब करा

* indicates required