भारतीय टी२० विश्वचषक संघात धोनी परत आलाय पण एका वेगळ्या भूमिकेत

दुबई- ओमान येथे यावर्षी टी ट्वेन्टी वर्ल्डकप होऊ घातला आहे. यासाठी १५ सदस्यीस संघाची घोषणा पण झाली आहे. अनेक नव्या खेळाडूंची निवड यासाठी झाली आहे. पण या सगळ्यात बीसीसीआयने एक सुखद सरप्राईज दिले आहे. भारताला पहिले टी ट्वेन्टी वर्ल्डकप जिंकून देणारा कॅप्टन कुल धोनी परतला आहे.

धोनी खेळाडू म्हणून नव्हे तर या टी ट्वेन्टी संघाचा मार्गदर्शक म्हणून या वर्ल्डकपमध्ये भूमिका बजावणार आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ही त्याची नवी सुरुवात समजली जात आहे. बीसीसीआयने पत्रकार परिषदेत ही गोष्ट केली आहे.

१७ ऑक्टोबरपासून या सामन्यांची ओमान येथे सुरुवात होणार आहे. बीसीसीआयकडून सांगण्यात आले की जेव्हा धोनीला या विषयी विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने फक्त टी ट्वेन्टी संघाचे मार्गदर्शक होण्यास संमती दिली. तसेच या विषयावर संघाचा कॅप्टन विराट कोहली आणि व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा यांची पण सहमती आहे.

४० वर्षीय धोनीने गेल्या वर्षीच आपली निवृत्ती घोषित केली होती. २०१९ सालच्या वर्ल्डकप सेमिफायनलमध्ये त्याने शेवटचा सामना खेळला होता. धोनीला टी ट्वेन्टी संघाचा मार्गदर्शक करणे का आणि किती महत्वाचे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

आजवर धोनीच्या मार्गदर्शनाखाली भारताने २००७ साली टी ट्वेन्टी आणि २०११ साली वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. तसेच आयसीसीच्या अनेक ट्रॉफीज धोनीच्या नावावर आहेत. जे इतर कुणाही भारतीय कॅप्टनला जमलेले नाही. आता धोनीच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा टी ट्वेन्टी वर्ल्डकप भारतात आला तर त्याच्या कर्तृत्वात आणखी भर पडेल.

सबस्क्राईब करा

* indicates required