किती आहे पाकिस्तानी खेळाडूंची संपत्ती?? एकटा विराट कमाईच्या बाबतीत संपूर्ण संघावर पडतोय भारी, वाचा....

नुकताच संपन्न झालेल्या आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत पाकिस्तान संघाने अप्रतिम कामगिरी केली होती. एकवेळ स्पर्धेच्या बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाने आधी सेमी फायनल आणि नंतर फायनलमध्ये एन्ट्री केली होती. मात्र अंतिम सामन्यात त्यांना इंग्लंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान खेळाडूंना नेहमी सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जाते. आजचा बोभाटाचा विषय जरा वेगळा आहे. नेहमी आपण भारतीय खेळाडूंच्या संपत्तीबद्दल बोलत असतो. आज आपण पाकिस्तान संघातील खेळाडूंकडे किती संपत्ती आहे याचा आढावा घेणार आहोत. चला तर पाहूया.

पाकिस्तानचे सर्वात श्रीमंत खेळाडू 

बाबर आझम : बाबर आझम हा पाकिस्तान संघाचा कर्णधार आहे. तो आयपीएल वळगता जगभरातील इतर लीग स्पर्धा खेळताना दिसून येत असतो. द स्पोर्ट्स लाईटच्या वृत्तानुसार, त्याची एकूण संपत्ती ५ मिलियन डॉलर ( ४० कोटी रुपये) इतकी आहे. बाबर आझम हा पाकिस्तानमध्ये मैदानाबाहेर देखील लोकप्रिय आहे. तसेच तो हेड अँड शोल्डर, एचबीएल आणि ओप्पो सारख्या ब्रँड्सचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे.

मोहम्मद रिजवान : पाकिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिजवान देखील सध्या जोरदार कामगिरी करतोय. त्याच्या एकूण संपत्ती बद्दल बोलायचं झालं तर , मिळालेल्या माहितीनुसार, त्याची एकूण संपत्ती ५ मिलियन डॉलर आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार, ४० कोटी रुपये इतकी आहे. मोहम्मद रिजवान हा गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान संघासाठी मोलाची भूमिका बजावत आहे.

इफ्तिकार अहमद : आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत जेव्हा जेव्हा पाकिस्तान संघ अडचणीत होता, त्यावेळी इफ्तिकार अहमद मधल्या फळीत फलंदाजीला येऊन योगदान देत होता. मिळालेल्या माहितीनुसार, इफ्तिकार अहमदची एकूण संपत्ती २ मिलियन डॉलर इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार, १६ कोटी रुपये इतकी आहे.

शाहीन आफ्रिदी: सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत शाहीन आफ्रिदी हा कर्णधार बाबर आजम पेक्षाही पुढे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहीन आफ्रिदीची एकूण संपत्ती ही ७ मिलियन डॉलर इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार तो ५६ कोटी रुपयांची कमाई करतो.सध्या तो पाकिस्तान संघातील प्रमुख गोलंदाज आहे.

हॅरीस रऊफ: पाकिस्तान संघातील वेगवान गोलंदाज हॅरीस रऊफ देखील कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. मिळालेल्या माहितीनुसार हॅरीस रऊफची एकूण संपत्ती ३.६९ डॉलर इतकी आहे. म्हणजेच तो ३० कोटी रुपयांची कमाई करतो. त्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कडून ५६८७ डॉलर मासिक वेतन दिले जाते.

ही झाली पाकिस्तान संघातील खेळाडूंची कमाई. मात्र एकटा विराट कोहली १२७ मिलियन डॉलर म्हणजे १०४६ कोटी रुपयांची कमाई करतो. संपूर्ण पाकिस्तान संघातील खेळाडूंची कमाई एकट्या विराट कोहलीपेक्षा कमी आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required