ICC World T20: भारत पाकिस्तान लढत नक्की, बघा इतर कोणते संघ आहेत आपल्या गृप मधे

T20 हा क्रिकेट फॉरमॅट सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. आयपीएलमुळे झटपट क्रिकेटकडे लोकांचा ओढा वाढला आहे. २००७ साली धोनीने T20 वर्ल्डकप जिंकून दिल्यामुळे हा वर्ल्डकप पुन्हा एकदा भारताकडे यावा अशी भारतीयांची मनोमन ईच्छा आहे.

यंदा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या काळात T20 वर्ल्डकप ओमान आणि यू.ए.ई. याठिकाणी खेळवला जाणार आहे. ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलकडून वर्ल्डकप सामन्यांसाठी ग्रुप ठरविले गेले आहेत. क्रिकेटचा कुठलाही फॉरमॅट असू द्या, भारत-पाकिस्तानच्या सामन्याकडे जगाचे लक्ष असते. यावेळी देखील हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार आहेत.

आयसीसीने हे ग्रुप मार्चपर्यंतच्या रँकिंगनुसार ठरवले आहेत. वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका हे संघ ग्रुप १ मध्ये असतील, तर ग्रुप २ मध्ये भारत पाकिस्तान, न्यूझिलंड, अफगाणिस्तान असे संघ असतील. पहिल्या राऊंडमध्ये ८ संघ खेळातील, त्यात ऑटोमॅटिक क्वालिफायर श्रीलंका, बांग्लादेश आणि आणखी सहा संघांचा समावेश असेल.

आयर्लंड, नेदरलँड आणि नामीबिया श्रीलंकेसोबत ए ग्रुपमध्ये असतील, तर ओमान, पीएनजी, स्कॉटलँड हे बांग्लादेश सोबत ग्रुप बी मध्ये असतील. कोरोनामुळे कमी काळात ही स्पर्धा आवरती घेतली जाणार असली तरी महिनाभर क्रिकेटप्रेमींना मात्र रंजक सामने पाहायला मिळणार आहेत.

भारत-पाकिस्तान ग्रुप स्टेजमध्ये तर खेळतीलच, पण दोन्ही संघ पुढील टप्प्यांमध्ये गेले तर अजून एक सामना या दोनही संघांमध्ये होऊ शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required