थॉमस कप : ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला बक्षिस म्हणून भारत सरकार काय देणार?

थॉमस कप (thomas cup) स्पर्धेत भारतीय संघाने (indian team) रविवारी (१५ मे) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच भारतीय संघाने या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. लक्ष्य सेन, श्रीकांत किदांबी, सात्विकसाईराज रँकिरेड्डी आणि त्यांचा जोडीदार चिराग शेट्टी यांनी अंतिम सामन्यात इंडोनेशियाचा पराभव भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

या अंतिम फेरीतील पहिला सामना लक्ष्य सेन आणि अँथनी गिंटिंग यांच्यादरम्यान पार पडला. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये लक्ष्य सेन पिछाडीवर होता. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये त्याने जोरदार पुनरागमन केले. त्याने हा सामना २१-८, १७-२१ आणि १६-२१ ने आपल्या नावावर केला. यानंतर पुरुष दुहेरीच्या सामन्यात सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना मोहम्मद अहसान आणि संजय सुकामुल्यो यांच्यासोबत पार पडला.

या सामन्यात देखील भारतीय खेळाडू पहिल्या सेटमध्ये १८-२१ ने पिछाडीवर होते. परंतु पुढील २ सेटमध्ये भारतीय खेळाडूंनी जोरदार पुनरागमन केले. त्यांनी पुढील २ सेट २३-२१ आणि २१-१९ ने आपल्या नावावर केले. सलग दोन विजयासह भारतीय संघ २-० ने आघाडीवर होता. अंतिम सामना श्रीकांत किदांबी आणि जोनाथन क्रिस्टी यांच्यादरम्यान होणार होता. जोनाथन क्रिस्टीने श्रीकांत किदांबीला यापूर्वी २ वेळेस पराभूत केले होते.

परंतु अंतिम सामन्यात श्रीकांत किदांबीने स्वतःवर कुठलाही दबाव येऊ दिला नाही. त्याने सुरुवातीच्या दोन सेटमध्ये २१-१५ आणि २३-२१ विजय मिळवला आणि भारतीय संघाला ३-० ने आघाडी मिळवून दिली. या ऐतिहासिक विजयानंतर अनेक दिग्गजांनी भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच भारत सरकारने देखील या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे आणि भारतीय संघाला १ कोटी रुपये बक्षिस स्वरूपात देण्याची घोषणा केली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required