computer

आयपीएल २०२०चं संपूर्ण वेळापत्रक फक्त एका क्लिकवर!!

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या ड्रीम 11 आयपीएल २०२० च्या वेळापत्रकाची शेवटी घोषणा झाली आहे. कोरोनामुळे यंदा युनायटेड अरब अमिरातीमध्ये प्रेक्षकांशिवाय होणारी ही पहिलीच स्पर्धा!! २०१४ नंतर दुसऱ्यांदा यूएईत या स्पर्धा भरविण्यात येत आहेत. १९ सप्टेंबर रोजी अबूधाबी येथे मुंबई आणि चेन्नईमधील धमाकेदार सामन्याने स्पर्धेला सुरूवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजेला स्पर्धेला सुरुवात होईल.

दुसरी आणि तिसरी मॅच दुबई येथे होईल, तर चौथी मॅच शारजहा येथे होणार आहे. दुबईत २४, अबुधाबीला २० तर शारजहाला १२ मॅचेस होणार आहेत. याआधी मुंबईचा खेळाडू लसीथ मलिंगा आणि चेन्नईचा खेळाडू सुरेश रैना यांनी माघार घेतली होती, तर काल हरभजनने देखील २ काय, २० कोटी दिले तरी खेळणार नाही म्हटले आहे. तर एकूण अशा वातावरणात यंदाच्या स्पर्धा भरविण्यात येणार आहे.

पहिलीच मॅच चेन्नई आणि मुंबईमध्ये असल्याने या दोघा टीमच्या फॅन्सध्ये तुफान उत्साह आहे. प्लेऑफचे स्थान आणि वेळ नंतर घोषित करण्यात येणार आहे. स्पर्धेत समाविष्ट होणाऱ्या सर्व ८ टीम्स आपल्या खेळाडू आणि इतर लोक यूएईत दाखल झाले आहेत. कोरोना चाचणी आणि क्वारंटाईमची प्रक्रिया या दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहेत. १० नोव्हेंबरला फायनल होऊन या स्पर्धेची सांगता होणार आहे.

बीसीसीआयने या स्पर्धेसाठी ७ कॉमेंटेटर्सची टीमसुद्धा तयार केली आहे. त्यात सुनील गावस्कर, हर्षा भोगले, रोहन गावस्कर, अंजुम चोपडा, मुरली कार्तिक, लक्ष्मण शिवरामाकृष्णन, दीप दासगुप्ता यांचा समावेश आहे.

रोज दोन मॅचेस खेळले जाणार आहेत. दुपारी ३:३० तर संध्याकाळी ७:३० अशा त्यांच्या वेळा असणार आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required