computer

काल विराट कोहलीच्या जागी बॅटिंग करायला कोण आला होता पाहिलं ना? जार्व्हो परत आलाय

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेत गेल्या सामन्यात एक जार्वो नावाचा इंग्लिश इसम मैदानात शिरला होता. त्यानंतर घडलेला भन्नाट किस्सा तुम्ही बोभाटावर वाचला असेल. आता हाच जार्वो पुन्हा एकदा सुरू असलेल्या सामन्यात शिरला होता.

जार्वो 69 असे आपल्या जर्सीव्हर घालून सेम टू सेम भारतीय जर्सी वाटेल असे कपडे घालून तो सिक्युरिटीचे लक्ष चुकवून मैदानात शिरला. यावेळी रोहित शर्मा आऊट झाल्यावर भाऊ थेट बॅटिंगसाठी हेल्मेट वैगरे घालून जाऊ लागला.

सिक्युरिटीच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला हटकले तेव्हा त्यांना मस्त आपणच भारताचे चौथ्या क्रमांकावर खेळणारा खेळाडू आहे हे तो पटवून देऊ लागला. शेवटी त्याला उचलून बाहेर घेऊन जावे लागले. हा व्हिडीओ वायरल झाल्यावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

भारतीय स्पिनर अश्विनने मात्र जार्वोने पुन्हा पुन्हा असे करू नये असे म्हटले आहे. आता मात्र हा जार्वो पुन्हा मैदानात शिरू नये याकडे डोळ्यात तेल घालून सिक्युरिटी लक्ष ठेवतील एवढे नक्की.

सबस्क्राईब करा

* indicates required