सलग ४ शतकांनंतर दुहेरी शतक! नारायण जगदीशनने रोहित अन् विराट सारख्या दिग्गजांना टाकलय मागे...

सध्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील प्रसिद्ध स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी २०२२ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत तामिळनाडू संघातील फलंदाज नारायण जगदीशन याने धावांचा पाऊस पाडत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग ४ शतके आणि १ दुहेरी शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा, दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाजी अल्विरो पीटरसन आणि कर्नाटक संघातील फलंदाज देवदत्त पडीक्कल यांना मागे सोडले आहे. या सर्व फलंदाजांनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग ४ शतके झळकावली आहेत.

नारायण जगदीशनने चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात, अरुणाचल संघाविरुद्ध फलंदाजी करताना ७६ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर अवघ्या ३८ चेंडूंमध्ये शतकी खेळी करत त्याने ११४ चेंडूंमध्ये दुहेरी शतकी खेळी केली. या शतकी खेळीनंतर त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या विराट कोहली, पृथ्वी शॉ, रुतुराज गायकवाड आणि देवदत्त पडीक्कल यांचा देखील विक्रम मोडून काढला आहे. विराट कोहलीने २००८-०९ मध्ये झालेल्या हंगामात ४ शतके झळकावली होती. त्याने या हंगामात ८९ च्या सरासरीने ५३४ धावा केल्या होत्या. 

तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने आगामी हंगामासाठी रिलीज केलेल्या नारायण जगदीशनची बॅट या हंगामात जोरदार तळपली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये ७९९ धावा केल्या आहेत. त्याच्याकडे या धावसंख्येत भर घालण्याची संधी असणार आहे. कारण तामिळनाडू संघाचा पुढील सामना केरळ संघाविरुद्ध पार पडणार आहे.

नारायण जगदीशनने केलेले विक्रम...

नारायण जगदीशन आणि सुधारसन या दोन्ही फलंदाजांमध्ये ४१६ धावांची भागीदारी झाली. ही लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात मोठी भागीदारी आहे. तसेच त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये २७७ धावांची खेळी करत रोहित शर्माचा सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम देखील मोडून काढला आहे. तसेच त्याने १४० चेंडूंमध्ये केलेली २७७ धावांची खेळी ही लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी आहे.

नारायण जगदीशनच्या मागील खेळ्या..

तामिळनाडू विरुध्द आंध्रप्रदेश: २७७ धावा

तामिळनाडू विरुध्द हरियाणा : १२८ धावा

तामिळनाडू विरुध्द गोवा : १६८ धावा

तामिळनाडू विरुध्द छत्तीसगड : १०७ धावा 

तामिळनाडू विरुध्द आंध्रप्रदेश : ११४ धावा

तामिळनाडू विरुध्द बिहार : ५

लिस्ट क्रिकेटमध्ये सर्वोच्च खेळी..

नारायण जगदीशन :२७७ धावा 

एडी ब्राऊन :२६८ धावा

रोहित शर्मा :२६४ धावा

डार्सी शॉर्ट : २५७ धावा

शिखर धवन : २४८ धावा

मुख्य बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघाने आगामी आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलावापूर्वी नारायण जगदीशनला रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याची ही जोरदार कामगिरी पाहता आगामी लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.

सबस्क्राईब करा

* indicates required