केवळ राजकारण आणि वशिलेबाजीच्या बळावर भारतीय संघात स्थान मिळवणारे टॉप ५ भारतीय खेळाडू...

क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की, एकदा तरी त्याने भारतीय संघाची जर्सी घालून मैदानात उतरावं. मात्र प्रत्येकाचं स्वप्नं पूर्ण होतं असं नाही. भारतीय संघात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, कपिल देव आणि एमएस धोनी सारखे दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत, ज्यांनी भारतीय संघाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक खेळाडूंना भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान असे देखील काही खेळाडू पाहायला मिळाले आहेत,ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये साजेशी कामगिरी केली नसतानाही केवळ राजकारणाच्या बळावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत. चला तर पाहूया.

१) सुदीप त्यागी :

२००९ मध्ये भारतीय संघात पदार्पण करणारा सुदीप त्यागी या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. सुदीप त्यागीला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्याला नशिबाने आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. या हंगामातील १४ सामन्यांमध्ये त्याला केवळ ६ गडी बाद करता आले होते. मात्र धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा त्याला फायदा झाला आणि भारतीय संघात त्याची एन्ट्री झाली. 

भारतीय संघासाठी त्याला ४ वनडे आणि १ टी -२० सामना खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याला केवळ ३ गडी बाद करण्यात यश आले. ही निराशाजनक कामगिरी पाहता त्याला आयपीएल आणि भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.

२) मनप्रीत गोनी :

आयपीएल स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आणखी एका खेळाडूला भारतीय संघात संधी मिळाली. हा खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज मनप्रीत गोनी. त्याने २००८ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना पदार्पण केले होते. 

मनप्रीत गोनीने भारतीय संघासाठी एकूण २ वनडे सामने खेळले. यादरम्यान त्याला ३८ च्या सरासरीने केवळ २ गडी बाद करता आले. तर आयपीएल स्पर्धेतील ४४ सामन्यांमध्ये त्याला ३७ गडी बाद करण्यात यश आले होते.

३) रोहन गावस्कर :

भारतीय संघातील दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांचा मुलगा रोहन गावस्कर याला २००४ मध्ये भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली होती. त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र वडिलांचे नाव पुढे लागल्यामुळे त्याला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली. चांगली कामगिरी करणाऱ्या इतर खेळाडूंना बाजूला ठेवून रोहन गावस्करला अनेकदा संधी दिली गेली मात्र तो साजेशी कामगिरी करू शकला नाही. 

त्याच्या कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर, त्याने ११ वनडे सामन्यांमध्ये १५१ धावा केल्या. तर टी -२० क्रिकेटमधील १० सामन्यांमध्ये त्याला केवळ ११३ धावा करता आल्या होत्या. या निराशाजनक कामगिरीनंतर जेव्हा तो संघाबाहेर झाला, त्यानंतर त्याला पुन्हा भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही.

४) स्टुअर्ट बिन्नी:

भारतीय संघाला वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता होती. अशा स्थितीत भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देणारे माजी भारतीय खेळाडू रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार अशी कामगिरी केली नव्हती. मात्र वडील निवड समितीमध्ये असल्याचा फायदा झाला आणि त्याची भारतीय संघात वर्णी लागली. त्याला भारतीय संघासाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. वनडेमध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये २३० धावा आणि २० गडी बाद केले. तर ६ कसोटी सामन्यांमध्ये १९४ धावा आणि ३ गडी बाद केले. तसेच टी -२० क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर त्याला ३ सामन्यांमध्ये केवळ  ३५ धावा करता आल्या.

५) गुरकिरत सिंग मान :

अष्टपैलू खेळाडू म्हणून गुरकिरत सिंग मान रवींद्र जडेजाची जागा घेऊ शकतो असे म्हटले जात होते. २०१६ मध्ये त्याला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र मालिकेतील तीनही सामन्यात त्याला केवळ एक गडी बाद करता आला. तर फलंदाजी करताना त्याला केवळ १३ धावा करता आल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकदा दोनदा चांगली कामगिरी केल्यानंतर राजकारण करून त्याला भारतीय संघात स्थान दिले गेले होते. मात्र तो पूर्णपणे फ्लॉप ठरला.

काय वाटतं? असा कोणता खेळाडू आहे जो केवळ राजकारण आणि वशिलेबाजीचा जोरावर भारतीय संघात स्थान मिळवू शकला? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required