सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सूर्या ठरलाय नंबर १! विराट अन् रोहितलाही सोडलय मागे...

सध्या टी -२० आंतरराष्ट्रीय  फलंदाजाच्या यादीत सर्वोच्च स्थानी असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) जोरदार फॉर्ममध्ये आहे. नुकताच संपन्न झालेल्या आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ (icc T20 world cup 2022) स्पर्धेत देखील त्याने जोरदार कामगिरी करत सर्वांचीच मने जिंकली होती. इतकेच नव्हे तर त्याची फलंदाजी करण्याची शैली पाहून अनेक दिग्गजांनी त्याची तुलना दिग्गज फलंदाज एबी डीविलियर्स सोबत केली होती.

मुख्य बाब म्हणजे सूर्यकुमार यादव हा भारतीय संघासाठी केवळ वनडे आणि टी -२० क्रिकेट खेळतोय. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाहीये. तरीदेखील तो २०२२ मध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.  तो भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. आज या लेखातून आम्ही तुम्हाला २०२२ मध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत.

भारतीय संघासाठी २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज...

सूर्यकुमार यादवने या वर्षात आतापर्यंत १० एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ९ डावांमध्ये २१६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ६४ आहे.  सूर्याने टी-२० सामन्यांमध्ये जोरदार कामगिरी करत ३० सामन्यांमध्ये ११५१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २ शतक आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे.  अशाप्रकारे २०२२ मध्ये सूर्यकुमार यादवने आतापर्यंत ३८ डावांमध्ये १३६७ धावा केल्या आहेत.

तसेच भारतीय संघातील इतर फलंदाजांच्या कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर, दुसऱ्या स्थानी डाव्या हाताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आहे. रिषभ पंतने यावर्षी ३६ डावांमध्ये ११९० धावा केल्या आहेत. तर भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने देखील यावर्षी जोरदार कमबॅक केले आहे. विराटने २०२२ मध्ये ३५ डावांमध्ये ११७६ धावा केल्या आहेत. तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत चौथ्या स्थानी आहे. रोहित शर्माने २०२२ मध्ये खेळलेल्या सामन्यांमध्ये एकूण ३८ डावांमध्ये ९१६ धावा केल्या आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required