नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी! टोकियो ऑलिम्पिक नंतर आता कुओर्ताने गेम्समध्ये फडकवला तिरंगा..

गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज चोप्राने आणखी एक मोठा पराक्रम केला आहे. फिनलॅंडमध्ये सुरू असलेल्या कुओर्ताने गेम्समध्ये नीरज चोप्राने (Neeraj Chopra)   शनिवारी (१८ जून) सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. नीरज चोप्राने विक्रमी ८६.८९ मीटर भाला फेकून हे पदक आपल्या नावावर केले. इतर कुठल्याही खेळाडूला इतक्या लांब भाला फेकता आला नाही. काही दिवसांपूर्वी नीरज चोप्राने नॅशनल रेकॉर्ड देखील बनवला होता. (kuortane games 2022)

नीरज चोप्राने पहिल्याच फेरीत ८६.८९ मीटर भाला फेकला होता. त्यानंतर कुठल्याही खेळाडूला त्याची बरोबरी करता आली नाही. त्यानंतर पुढील दोन्ही थ्रो त्याने फाऊल थ्रो फेकले. यादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला असता. मात्र तो थोडक्यात बचावला. थ्रो करताना त्याचा पाय सरकला होता.

नीरज चोप्राने यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. असा पराक्रम करणारा तो एकमेव भारतीय भालाफेकपटू ठरला होता. आता कुओर्ताने गेम्समध्ये देखील त्याने चमकदार कामगिरी केली आहे. या कामगिरीनंतर देशभरातून त्याचे कौतुक केले जात आहे. हे यश मिळवल्यानंतर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील ट्विट करत त्याचे कौतुक केले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required