आजच्याच दिवशी कपिल देवने झळकावले होते भारतासाठी वनडेतील पहिले शतक, वाचा ऐतिहासिक खेळीबद्दल अधिक..

केवळ भारतीय क्रिकेट नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील कपिल देव (Kapil dev) यांचं नाव आदराने घेतलं जातं. कपिल देव यांनी भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आणि भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण काळाला सुरुवात झाली. हेच कारण आहे की, जेव्हा जेव्हा कपिल देव यांचं नाव घेतलं जातं. त्यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेटला दिलेलं योगदान डोळ्यासमोर येतं. १८ जून हा दिवस कपिल देव यांच्यासाठी खूप खास आहे. आजच्याच दिवशी त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी पहिले शतक झळकावले होते. या ऐतिहासिक दिवसाला ३९ वर्ष पूर्ण झाली आहेत.

आजपासून (१८ जून)३९ वर्षांपूर्वी क्रिकेट विश्वात एक नाव खळबळ उडवत होतं ते म्हणजे कपिल देव. १९८३ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर संपूर्ण क्रिकेट विश्व हादरून गेलं होतं. त्यावेळी एका नव्या भारतीय संघाचा जन्म झाला होता. त्यावेळी कोणी विचारही केला नव्हता की, भारतीय संघातील फलंदाज इंग्लंडमध्ये जाऊन, उसळी घेणाऱ्या चेंडूंचा सामना करतील आणि वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघातील गोलंदाजांचा घाम काढतील. मात्र २४ वर्षीय कपिल देवने आपल्या संघातील खेळाडूंमध्ये तो विश्वास निर्माण करून दिला की, 'होय,आपण करू शकतो..' मग जे झालं ते संपूर्ण क्रिकेट विश्र्वानं पाहिलं.

गडी बाद १७ अशी होती भारतीय संघाची स्थिती..

तर झाले असे की, १८ जून १९८३ रोजी भारतीय संघाचा सामना झिम्बाब्वे संघासोबत सुरू होता. ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला धूळ चारत भारताने अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं होतं. अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या दिशेने पडला. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरताना दिसून आला. भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नाही.

सलामीवीर फलंदाज सुनील गावस्कर भोपळाही न फोडता माघारी परतले. तर श्रीकांतने १३ चेंडू खेळून पॅव्हेलियनची वाट धरली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेले मोहिंदर अमरनाथ ५, संदीप पाटील १, आणि यशपाल शर्मा अवघ्या ९ धावा करून बाद झाले. भारतीय संघातील वरच्या फळीतील फलंदाजांना केवळ १७ धावा जोडता आल्या.

कपिल देवने झळकावले तुफानी शतक

एका पाठोपाठ एक पाच फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. अशावेळी भारतीय कर्णधार कपिल देव संकटमोचक म्हणून भारतीय संघाच्या मदतीला धावून आले. अडचणीत असलेल्या भारतीय संघाला बाहेर काढण्यासाठी कपिल देव यांनी रॉजर बिन्नी, रवी शास्त्री आणि मदन लाल यांच्यासोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. संघाची धावसंख्या १४० असताना भारतीय संघाचे ८ फलंदाज तंबूत परतले होते. 

त्यानंतर कपिल देव यांनी विस्फोटक फलंदाजी करत सय्यद किरमानी सोबत मिळून १२६ धावांची भागीदारी केली होती. या भगिदारीच्या जोरावर भारतीय संघाने ६० षटक अखेर ८ गडी बाद २६६ धावा केल्या होत्या. तर कपिल देव यांनी १३८ चेंडूंमध्ये नाबाद १७५ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्यांनी १६ चौकार आणि ६ षटकार मारले होते. हा सामना भारतीय संघाने ३१ धावांनी आपल्या नावावर केला होता. त्यावेळी कुठल्याही भारतीय क्रिकेटपटूने वनडे क्रिकेटमध्ये झळकावलेलं हे पहिलं शतक होतं.

सबस्क्राईब करा

* indicates required