computer

मैदानावर सोन्याची चैन मिरवणारा प्रवीण कुमार कुठे गेला?

भारतीय संघात विविध पार्श्वभूमीचे खेळाडू भरती होत असतात. बराच संघर्ष करून राष्ट्रीय संघात त्यांना जागा मिळत असते. असाच एक खेळाडू होता प्रवीण कुमार. घर पैलवानकीची पार्श्वभूमी असलेलं, तर वडील पोलिसांत आणि त्याला क्रिकेटचे वेड लागले होते. 

लहानपणीच क्रिकेट खेळत असताना त्याला आपण बॉल चांगला स्विंग करू शकतो हे समजले आणि त्याने स्वताला क्रिकेटसाठी झोकून दिले. रणजी खेळताना त्याने चांगली कामगिरी केली. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याला 'प्लेयर ऑफ द एयर' देखील करण्यात आले. 

प्रवीण कुमारला राष्ट्रीय संघात स्थान तर मिळाले पण तो जास्त दिवस टिकू शकला नाही. त्याच्यात क्षमता नव्हती म्हणून नव्हे तर त्याला दुखापतींनी खूप त्रास दिला. त्याला चे क्रिकेट करियर यातच संपले.

त्याने ६ टेस्ट सामने खेळले, पण त्यात देखील त्याने २७ विकेट्स घेत छाप पाडली. ६८ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने कामगिरी दाखवली. त्यात त्याने ७७ विकेट्स घेतल्या. त्याचे नशीब एवढे खराब की त्याचे २०११ वर्ल्डकपमध्ये निवड होऊन देखील दुखापतीमुळे त्याला सामिल होता आले नव्हते.

असे असले तरी त्याने आयपीएल चांगली गाजवली होती. आयपीएलमध्ये त्याने गुजरात लायन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, सनरायजर्स हैदराबाद या संघांकडून मैदान गाजवले. क्रिकेटपेक्षा आपल्या रांगड्या स्वभावामुळेच तो प्रसिद्ध होत असे.

मैदानावर गुंठामंत्र्यांसारखी मोठी सोनसाखळी गळ्यात फिरवून मिरवल्यामुळे त्याने बरीच टीका सहन केली होती. त्याने राष्ट्रीय नेमबाजपटू सपना चौधरी सोबत लग्न केले आहे. निवृत्त झाल्यावर त्याने राजकारणात देखील हात मारून बघितला. पण त्यात देखील जम न बसल्याने तो बिझनेसकडे वळला. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमीही आली होती. त्याने मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेऊन उपचार सुरु केले होते.

क्रिकेटच्या झगझगत्या दुनियेकडे आकर्षित होणाऱ्या तरुण खेळाडूंनी एकदा प्रवीण कुमार सारख्या खेळाडूंचाही अभ्यास करायला हवा. तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required