गतवर्षी खेळलेल्या या ३ गोलंदाजांची आगामी टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेतून होऊ शकते सुट्टी...

येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. यावर्षी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱ्या भारतीय संघात काही महत्वपूर्ण बदल पाहायला मिळू शकतात. गेल्या काही महिन्यांपासून बीसीसीआयने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करून टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱ्या भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. आम्ही या लेखातून तुम्हाला अशा ३ भारतीय खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत, जे २०२१ टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात होते. मात्र आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत या खेळाडूंचा पत्ता कट होऊ शकतो. चला तर पाहूया कोण आहेत ते ३ खेळाडू.

१) वरून चक्रवर्ती (Varun Chakrawarthy) :

मिस्ट्री स्पिनर म्हणून वरून चक्रवर्तीला २०२१ टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. मात्र या स्पर्धेत वरून चक्रवर्तीची गोलंदाजी फिकी पडली आणि फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली. तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेत देखील त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. ८ सामन्यांमध्ये त्याला केवळ ४ गडी बाद करण्यात यश आले. हेच कारण आहे की, तो आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसण्याची शक्यता खूप कमी आहे.

) राहुल चाहर (Rahul chahar) :

आयपीएल स्पर्धेत केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर राहुल चाहरला भारतीय संघात स्थान मिळाले होते. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात त्याने स्थान मिळवले मात्र, त्याला आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. हेच कारण होते की, एकदा भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर त्याला पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करता आलं नाही. त्यामुळे येत्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत राहुल चाहरला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

) आर अश्विन (R Ashwin) :

भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन हा कसोटी संघातील एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे. मात्र गतवर्षी झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत आर अश्विनला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. या निर्णयाने अनेकांना आश्चर्यचकित केले होते. आता रवींद्र जडेजा आणि युजवेंद्र चहल सारखे गोलंदाज भारतीय संघात असताना आर अश्विनला टी -२० संघात स्थान दिले जात नाहीये. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत आर अश्विनची भारतीय संघात निवड होणं जरा कठीणच आहे.

काय वाटतं? यापैकी कुठल्या गोलंदाजाला आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळू शकते? कमेंट करून नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required