computer

आयपीएलच्या चाहत्यांचा नवा हिरो सिंगापूरचा टीम डेव्हीड !

जगात काही देश असे आहेत, जिथे क्रिकेट तरी खेळले जाते का असा प्रश्न पडावा कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या देशांचे नाव कुठेही दिसून येत नाही. असाच एक देश म्हणजे सिंगापूर. पण याच देशाच्या एका खेळाडूने आयपीएलमध्ये फुल हवा केली आहे. 

टीम डेव्हिड असे या खेळाडूचे नाव आहे. आजवर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला घेतले आहे. पठ्ठ्याला चाहत्यांनी विनंती करुन घ्यायला लावले. कारण एकच तुफान बॅटिंग करतो. याच सोबत त्याने एक विक्रमही करून टाकला.

 

टीम डेव्हिड असा एकमेव खेळाडू आहे ज्याच्या देशाच्या संघाला आयसीसीने टी ट्वेन्टी सोडून कुठल्याही प्रकारचे क्रिकेट खेळण्यास मान्यता दिलेली नाही. तरीही तो आयपीएलमध्ये खेळत आहे. डेव्हीडने आपल्या पहिल्या सामन्यात जरी निराशा केली असली तरी त्याच्याकडून अपेक्षा मात्र मोठ्या आहेत.

आपल्या पहिल्या सामन्यात फक्त एक धाव काढुन तो कॅच देऊन आऊट झाला. आता तुम्ही म्हणाल जर हा आंतरराष्ट्रीय सामना अजून खेळला नाही तर त्यांची हवा कशी झाली? तर याआधी त्याने बिग बॅश, विटालिटी ब्लास्ट आणि पाकिस्तान सुपर लीग अशा स्पर्धांमध्ये धुराळा उडवला आहे.

 

 

गेल्याच महिन्यात इंग्लंडच्या रॉयल लंडन कपमध्ये खेळताना त्याने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. ८ सामन्यात त्याने ३४० धावा कुटून काढल्या. त्यात एका सामन्यात तर ७० बॉल्सवर १४० धावा करत बंदे मे है दम हे सिद्ध केले आहे. या स्पर्धेत त्याने २ शतक ठोकले आहेत.

आयपीएलमध्ये अजून त्याने एकच सामना खेळला आहे. पुढील सामन्यात त्याने आधीसारखी जादू दाखवली तर आयपीएलमधील नवा स्टार म्हणून पुढे यायला टीम डेव्हिडला वेळ लागणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required