निवृत्ती नंतरही धोनी करतोय कोटींची कमाई! जिम ते ड्रोन या १० बड्या कंपन्यांमध्ये केली आहे कोटींची गुंतवणूक..

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (Ms Dhoni) याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्ती जाहीर करून २ वर्ष झाली असली तरीदेखील त्याची लोकप्रियता काही कमी होताना दिसत नाहीये. तो काहीना काही कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच त्याने गरुड एयरोस्पेस (Garuda Aerospace) मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. तसेच तो या कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर देखील आहे. एमएस धोनीने गुंतवणूक केलेली ही पहिली कंपनी नाहीये. यापूर्वी देखील अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. जिम पासून ते मोठ मोठ्या हॉटेलचा तो मालक आहे.

१) गरुड एयरोस्पेस :

नुकताच एमएस धोनीने भारतीय ड्रोन स्टार्टअप कंपनी गरुड एयरोस्पेसमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्याची लोकप्रियता पाहता त्याला या कंपनीचे ब्रँड ॲम्बेसेडर देखील करण्यात आले आहे. त्याने या कंपनीत किती गुंतवणूक केली आहे, याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाहीये. या कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून ३३ अँटी-ड्रोन बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे.

२) प्रोडक्शन हाऊस :

एमएस धोनी प्रोडक्शन हाऊसचा देखील मालक आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊसचा सर्व कारभार त्याची पत्नी साक्षी धोनी पाहते. या प्रोडक्शन हाऊसने २०१९ मध्ये 'रोअर ऑफ द लायन' सिरिजची निर्मिती केली होती.

३) जिम :

लोकांना फिटनेस सोल्यूशन्स देण्याच्या उद्देशाने एमएस धोनीने जिम क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. स्पोर्ट्सफिट वर्ल्ड या नावाने भारतभर त्याच्या २०० हून अधिक जिम आहेत.

४)स्पोर्ट्स वेयर:

धोनीचा स्वतःचा स्पोर्ट्स वेअर आणि फुटवेअर ब्रँड देखील आहे. २०१६ मध्ये, त्याने आपला सेव्हन हा लाईफस्टाईल ब्रँड लाँच केला होता. ७ हा त्याचा जर्सी क्रमांक देखील आहे.

५) स्पोर्ट्स मार्केटिंग अँड मॅनेजमेंट फर्म:

 स्पोर्ट्स मार्केटिंग आणि मॅनेजमेंट फर्म, रिती स्पोर्ट्समध्येही एमएस धोनीने गुंतवणूक केली आहे. तसेच फाफ डू प्लेसिस आणि भुवनेश्वर कुमार या क्रिकेटपटूंनी देखील या मार्केटिंग फर्ममध्ये गुंतवणूक केली आहे.

६) सेंद्रिय शेती :

एमएस धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने रांची येथील फार्म हाऊसवर सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. ४३ एकर शेत जमीन असलेल्या फार्ममध्ये त्याने कोबी, टोमॅटो, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी सारख्या फळांची आणि भाज्यांची लागवड केली आहे.

७) खाताबुक ॲप:

२०२१ मध्ये एमएस धोनीने खाताबुक या स्टार्टअप ॲपमध्ये गुंतवणूक केली होती. खाता बुक ॲपद्वारे छोट्या मोठ्या उद्योजकांना हिशोब डिजिटल स्वरूपात साठवून ठेवण्यास मदत होते. या ॲपचा तो ब्रँड ॲम्बेसेडर देखील आहे.

) हॉटेल :

एमएस धोनीचे हॉटेल माही रेसिडेन्सी नावाचे हॉटेल देखील आहे. हे फार कमी लोकांना माहित आहे. हे हॉटेल झारखंड येथील रांची शहरात आहे. मात्र या हॉटेलची इतर कुठेही फ्रँचायजी नाहीये.

) फुटबॉल संघ :

एमएस धोनीला क्रिकेटसह फुटबॉल खेळायला देखील खूप आवडतं. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनसह एमएस धोनी हा लोकप्रिय इंडियन सुपर लीग स्पर्धेतील फ्रँचायजी चेन्नईयन एफसीचा सह संघमालक आहे.

१०) फूड अँड बेवरेज कंपनी :

सेव्हन इंक ब्र्यूजने गतवर्षी एमएस धोनीला आपल्या कंपनीचे ब्रँड ॲम्बेसेडर बनवले होते. धोनीकडे या कंपनीचे शेअर्स देखील आहेत. गतवर्षी एमएस धोनीमुळे हा ब्रँड भरपूर चर्चेत आला होता.

तसेच एमएस धोनी आयपीएल स्पर्धेतून आणि जाहिरातीतून कोट्यावधींची कमाई करत असतो.

सबस्क्राईब करा

* indicates required