केवळ आझम खान नव्हे तर त्याच्या आधी 'या' जाड्या खेळाडूंनी गाजवलंय क्रिकेटचं मैदान

पाकिस्तान संघातील वजनदार फलंदाज आझम खान सध्या आपल्या तुफान फलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. नुकताच सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत तो जोरदार फटकेबाजी करताना दिसून येत आहे. इस्लामाबाद युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ९७ धावांची तुफानी खेळी केली. आपल्या फलंदाजीसह तो अनेकदा आपल्या वजनामुळेही चर्चेत आला आहे. मात्र जाड असून क्रिकेटचं मैदान गाजवणारा आझम खान हा पहिलाच क्रिकेटपटू नाहीये. तर अनेक असे जाड क्रिकेटपटू आहेत ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर जोरदार कामगिरी केली आहे

) रहकीम कॉर्नवॉल:

वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व करणारा रहकीम कॉर्नवॉल हा क्रिकेट इतिहासातील सर्वात जाड खेळाडू आहे. तो तुफान फटकेबाजी आणि फिरकी गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. १४७ किलोग्रम वजन असलेला हा खेळाडू वेगवान गोलंदाजी देखील करतो. तसेच सलामीला फलंदाजीला येऊन गोलंदाजांचा चांगलाच समाचार देखील घेतो.

) ड्वेन लेव्हरॉक:

ड्वेन लेव्हरॉक हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतयं का? होय, रॉबिन उथप्पा फलंदाजी करत असताना स्लीपला क्षेत्ररक्षण करताना एका हाताने अप्रतिम झेल टिपणारा ड्वेन लेव्हरॉकच होता. वजन १२७ किलोग्रम तरीदेखील त्याने क्षणाचाही विलंब न करता भन्नाट झेल टिपला होता.

) अर्जुन रणतुंगा:

जाड क्रिकेटपटूंच्या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा हा तिसऱ्या स्थानी आहे. १९९६ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने श्रीलंकेला जेतेपद मिळवून दिले होते. ज्यावेळी तो क्रिकेट खेळायचा त्यावेळी त्याचे वजन ११५ किलोग्रॅम होते.

) इंझमाम-उल-हक

पाकिस्तान संघाचा माजी फलंदाज इंझमाम-उल-हक हा या यादीत चौथ्या स्थानी आहे. उंच धिप्पाड असलेल्या इंझमाम-उल-हकचे वजन १०० पेक्षाही अधिक होते. इंझमाम-उल-हक हा पाकिस्तान संघातील दिग्गज फलंदाज आहे. त्याने आपल्या संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा केल्या आहेत.

) आझम खान

पाकिस्तानचा भरभक्कम फलंदाज आझम खानचे वजन ११० किलोग्रॅम आहे. एकवेळ अशी ही आली होती जेव्हा त्याचे वजन १४० च्या पार गेले होते. आक्रमक फलंदाज असलेला आझम खान हा माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोईन खानचा मुलगा आहे.

आणखी असा कोण आहे जो जाड असूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करतोय? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required