आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पाकिस्तानने भारतीय संघाला टाकलं मागे, असे आहेत टॉप -५ संघ..

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) (Icc) तर्फे १३ जून २०२२ रोजी आयसीसी वनडे संघांची रँकिंग (Icc odi men's team ranking) जाहीर करण्यात आली आहे. या यादीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना रेटिंग पॉइंट्स दिले जातात. त्यावरून संघांची रँकिंग ठरत असते. या यादीत पाकिस्तान (Pakistan cricket team) संघाला चांगल्या कामगिरीचे फळ मिळाले आहे. नुकताच पाकिस्तान संघाने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत ३-० ने विजय मिळवला होता. या यादीत पाकिस्तान संघाने भारतीय संघाला (Indian cricket team) पछाडत चौथे स्थान मिळवले आहे. तर चौथ्या स्थानी असलेला भारतीय संघ आता पाचव्या स्थानी पोहोचला आहे. 

न्यूझीलंड संघ अव्वल स्थानी..

आयसीसी तर्फे जाहीर करण्यात आलेल्या यादीत न्यूझीलंड संघाने पहिले स्थान मिळवले आहे. तर दुसऱ्या स्थानी इंग्लंड संघ आहे. तसेच तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया, चौथ्या स्थानी पाकिस्तान आणि पाचव्या स्थानी भारतीय संघ आहे. येत्या काही दिवसांत भारतीय संघ इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघाविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघ पाकिस्तान संघाला पछाडत पुढे निघू शकतो.

ऑस्ट्रेलिया १०७ रेटिंग सह तिसऱ्या स्थानी...

न्यूझीलंड संघ १२५ रेटिंग सह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. तर इंग्लंड संघ १२४ रेटिंग सह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघ १०७ रेटिंग सह तिसऱ्या स्थानी आहे. तर पाकिस्तान संघ १०६ रेटिंग सह चौथ्या स्थानी आहे आणि भारतीय संघ १०५ रेटिंग सह पाचव्या स्थानी आहे. या यादीत दक्षिण आफ्रिका संघ सहाव्या स्थानी, बांगलादेश संघ सातव्या स्थानी आहे. तर श्रीलंका संघ आठव्या स्थानी, वेस्ट इंडिज संघ नवव्या स्थानी आणि अफगाणिस्तान संघ दहाव्या स्थानी आहे.

असे आहेत १० संघ

१) न्यूझीलंड

२) इंग्लंड

३) ऑस्ट्रेलिया 

४) पाकिस्तान 

५) भारत

६) दक्षिण आफ्रिका

७) बांगलादेश

८) श्रीलंका

९) वेस्ट इंडिज

१०) अफगाणिस्तान

इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली तर भारतीय संघ लवकरच पाकिस्तान संघाला मागे टाकू शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required