computer

जेव्हा राहुल द्रविडला खरोखर राग येतो....हे तीन किस्से वाचा !!

Subscribe to Bobhata

राहुल द्रविड म्हणजे शांतीचा पुतळाच जणू! मैदानावर तासंतास खेळत असताना त्याच्या चेहऱ्यावर थोडी देखील चिडचिड दिसायची नाही. त्याच्या शांत स्वभावाचे अनेक किस्से सांगितले जातात. काल परवा द्रविडने एक ऍड केली ज्यात त्यांचा रागीट लूक बघायला मिळाला. द्रविडला कधीही या मूडमध्ये बघितले नसल्याने त्या ऍडची चांगलीच चर्चा झाली.

द्रविड हा खऱ्या अर्थाने एकही ‘हेटर’ नाही असा खेळाडू आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील तो कमालीच्या शांत चित्ताने वावरत असतो. पण द्रविडला देखील संताप आलेला आहे. चला तर आज द्रविडला खरोखर राग आल्याचे किस्से जाणून घेऊ.

भारताचा पूर्व क्रिकेटर डोडा गणेश याने एक व्हिडीओ ट्विट केला आहे, ज्यात द्रविड पॅवेलीयन मधून ओरडताना दिसत आहे. ही गोष्ट आहे १९९७ सालची. झाले असे की, रणजी ट्रॉफीची सेमिफायनल हैदराबाद आणि कर्नाटकमध्ये होत होती. द्रविड कर्नाटककडून खेळत होता. विजयासाठी जेव्हा एक धाव हवी होती तेव्हा द्रविडबे ओरडून ओरडून मैदानावर असलेल्या खेळाडूंना काय करायचे हे सांगितले होते. शेवटी शेवटच्या बॉलवर चौकार मारत कर्नाटकच्या खेळाडूने त्यांना विजय मिळवून दिला होता.

पुढचा किस्सा आहे २००४ सालचा. भारत पाकिस्तान यांच्यात इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना खेळला जात होता. द्रविड धाव घेण्यासाठी जेव्हा धावायला लागला तेव्हा शोएब अख्तर मध्ये आला. अख्तर मध्ये येऊन थांबला नाही तर त्याने द्रविडला बघून शेरेबाजी केली. द्रविड यावेळी चांगलाच भडकला होता, तो चक्क अख्तरच्या दिशेने चालून गेला होता, पण पाकिस्तानी कॅप्टन इंझमाम उल हक याने मध्ये येऊन द्रविडला शांत केले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाल्यावर द्रविड जेव्हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक म्हणून काम बघत होता, त्यावेळी एका सामन्यात मुंबईविरुद्ध राजस्थानने चांगली बॅटिंग करत १८९ धावा केल्या होत्या. पण राजस्थानच्या बॉलर्सची जबरदस्त धुलाई करत मुंबईने अवघ्या १४ व्या ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. त्यावेळी हा दारुण पराभव बघून द्रविडने संतापात चक्क आपली टोपी फेकून दिली होती.

तर हे होते काही किस्से ज्यात 'साक्षात' राहुल द्रविड संतापलेला दिसत आहे. यावरून ज्याप्रमाणे 'मर्द को भी दर्द होता है' असे म्हणतात त्याप्रमाणे 'द्रविड को भी गुस्सा आता है' असेच म्हणावे लागेल.

सबस्क्राईब करा

* indicates required