computer

कोण जिंकणार यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप ? आजवरचा वर्ल्डकपचा इतिहास काय सांगतो ?

वर्ल्डकपचा रनसंग्राम सूरु होत आहे. सगळ्याच टिम्स जंगी तयारीने उतरल्या आहेत. सगळ्यांना वाटते आपण जिंकु पण ‘ये वर्ल्डकप है बॉस!!’ एवढे पण सोपे नाही ते. अनेकांना फायनल मध्ये थोडक्यात पराभव पाहावा लागलेला आहे. तोंडातला घास हिरावून नेणे म्हणजे काय ते या फायनलमध्ये हरलेल्या टिम्सला विचारा मंडळी!! बिचारी साऊथ आफ्रिकन टिम तर दरवेळी सेमी फायनल मध्ये येऊन हरते. त्यांच्यावर लागलेला चोकर्सचा शिक्का त्यांना आजवर पुसता आलेला नाही.

यावेळी 10 देशांच्या टिम्स वर्ल्डकपच्या रणसंग्रामात उतरनार आहेत. भारताने जरी फक्त 2 वेळा वर्ल्डकप जिंकला असला तरी आपण दरवेळी विजयाचे प्रमुख दावेदार असतो. यावेळी इंग्लंड पण आपल्याबरोबर  जेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. मंडळी, खरं म्हणजे क्रिकेटची सुरुवात केली इंग्लंडने पण आजही वर्ल्डकप त्यांना ठेंगा दाखवत आहे. क्रिकेट ज्यांनी सूरु केला, त्यांना अजुन एकदाही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. या गोष्टिचे दुःख इंग्लंडच्या प्रत्येक माणसाला आहे. यावेळी तरी वर्ल्डकपचा त्यांचा दुष्काळ संपतो का हे पाहणे मजेदार ठरणार आहे.

यावेळी इंग्लंडमध्येच वर्ल्डकप होणार आहे. म्हणुन निदान घरच्या मैदानावर तरी दिवे लावावेत अशी अपेक्षा इंग्लंडचे नागरिक करत आहेत. आयपीएल म्हणजे चेन्नई आणि वर्ल्डकप म्हणजे ऑस्ट्रेलिया हे समीकरण म्हटले जाते. मंडळी, हे भौ फक्त सेमी फायनलला पोहोचायला पाहिजे. सेमी फायनलला पोचण्यासाठी त्यांना खुप मेहनत घ्यावी लागते. पण एकदा सेमी फाइनल गाठली रे गाठली कप त्यांचाच झाला म्हणुन समजा. ऑस्ट्रेलियाने आजवर सर्वात जास्त म्हणजे तब्बल 5 वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. दुसरीकडे आपण 2 वेळा जिंकून हम भी किसी से कम नही दाखवून दिले आहे.

मंडळी. वेस्टइंडीजने पहिले दोन्ही कप जिंकून आम्हीच क्रिकेटचे बादशाह हे सिद्ध केले. पण नंतर या भाऊंना ऑस्ट्रेलियाने जो ब्रेक लावला तो अजुनही लागलेलाच आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेने पण एकेकदा वर्ल्डकप जिंकला आहे. म्हणुन नाही म्हटले तरी ते पण दावेदार आहेतच. न्युझीलंडची टिम बिचारी मागच्या फायनल मध्ये हरली. त्यांच्याकडे एकाहुन एक अफलातून प्लेयर्स आहेत पण यांना पण आजवर वर्ल्डकपने हुलकावणीच दिली आहे. इंग्लंड आणि आफ्रिकेबद्दल वर सांगितलेच आहे. मग उरतात बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांना कमी समजु नका मंडळी!!

हे गड़ी कधी कुठल्या टिमला हरवतील आणि त्यांचे वर्ल्डकपचे तिकीट कापतील सांगता येत नाही. कुठली टिमचा वीक पॉइंट काय आहे, स्ट्रॉन्ग पॉइंट काय आहे, आणि कुठली टिम वर्ल्डकपवर आपले नाव कोरु शकते हे आजवरच्या इतिहासावरुन समजून घेऊया...

भारत

दोन वेळचा चँपियन असलेला भारत यावेळी पण वर्ल्डकप जिंकून आणेल असा सर्वाना विश्वास आहे. सध्या जगभरात ज्याच्या बॅटिंगची चर्चा आहे तो विराट कोहली आपला कॅप्टन असल्यावर आपण प्रमुख दावेदार असणारच आहोत. नाही का?

सध्या आपली टिम एका पाठोपाठ एक सीरीज जिंकत आहे. मागच्या वर्षी एशिया कप, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडला त्यांच्याच घरात हरवून दाखवून दिले की आम्ही फक्त कागदावरचे वाघ नाहीतर मैदानावरसुद्धा वाघ आहोत. आपल्याकडे बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग या तिन्ही साठी तगडे खेळाडू आहेत आणि हाच आपला सर्वात मोठा प्लस पॉइंट मानला जात आहे.

इंग्लंड

मंडळी, वर सांगितले तसे या गोऱ्या साहेबांनी जगाला क्रिकेट दिले पण अजुन त्यांनाच कप मिळालेला नाही. दरवेळी चँपियन बनण्याचे स्वप्न घेऊन मैदानात उतरणारे गोरे साहेब फायनल पर्यंत तर जातात पण तिथे हरून परत येतात. एक दोनदा नाहीतर तब्बल तीनदा हे गड़ी फायनल पर्यंत पोहोचून परत आले आहेत. 2011 साली आपण वर्ल्डकप जिंकलो यात आपल्या घरच्या मैदानावर मॅचेस झाल्याचा आपल्याला फायदा मिळाला होता. आता यावेळी इंग्लंडमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याने या गोष्टीचा त्यांना निश्चित फायदा होईल. त्यांचे नशीबपण जोरावर आहे मंडळी! वनडेच्या रँकिंगमध्ये नंबर वन आहेत गोरे साहेब सध्या!! जोय रूट, इयान मॉर्गन, बटलर सारखे प्लेयर्स असल्याने इंग्लंड कप घेऊन गेला तर आश्चर्य वाटायला नको मंडळी!!

ऑस्ट्रेलिया

आजवर सर्वात जास्त वर्ल्डकप जिंकले असल्याने कांगारू जेतेपदाचे प्रमुख दावेदार असणे साहजिक आहे मंडळी!! गेल्या काही काळापासून त्यांच्या मागे शनी लागलेला आहे. त्यांचे दोन महत्वाचे प्लेयर्स फिक्सिंगमुळे गेल्या अनेक दिवसांपासुन क्रिकेटपासुन दूर आहेत. तसेच गेल्या काळात इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि भारताने पण त्यांना हरवले आहे. 

दक्षिण आफ्रिका

जगात चॉकर्स म्हणून प्रसिद्ध असलेली दक्षिण आफ्रिकेची टिम यावेळी तरी त्यांच्यावर लागलेला डाग पुसते का हे बघणे मजेदार ठरणार आहे. डिविलीयर्सने निवृत्ती घेतल्याने ही टिम थोडी कमकुवत दिसत असली तरी हासिम आमला सारखे हातावर मॅच फिरवणारे प्लेयर्स असल्याने त्यांची दावेदारी कमी झालेली नाही

न्यूझीलँड

हे भाऊ पण सेमी फायनल मध्ये हरण्यासाठीच प्रसिद्ध आहेत. असे फार कमी वेळा झाले आहे की न्यूझीलँड सेमी फायनल मध्ये पोहोचली नाही. पण सेमी फायनल मधून घरी येणे मात्र नेहमीचे आहे. रॉस टेलर सारखा धुवांधार बॅटिंग करणारा प्लेयर आणि मार्टिन गुप्तील, केन विल्यम्सन सारखे प्लेयर पण न्यूझीलँडला वर्ल्डकप जिंकून देऊ शकतात.

तर मंडळी, या आहेत त्या टिम्स ज्या वर्ल्डकप जिंकण्याच्या स्पर्धेत आहेत. जर काही चमत्कार झाला नाही तर यांच्यापैकी कुठली तरी एक टिम वर्ल्डकप घेऊन जाईल. पाकिस्तान आणि श्रीलंका सध्या खूप वाईट काळातून जात असल्याने यावेळी तरी वर्ल्डकप त्यांच्याकडे जाणार नाही असे दिसत आहे. राहिला प्रश्न बांगलादेश आणि अफगणिस्तानचा तर त्यांना वर्ल्डकप जिंकण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. त्यांनी तगडी टिम उभी केल्यास लवकरच ते पण वर्ल्डकपला गवसणी घालू शकतील.

 

मंडळी, हे होते वर्ल्डकपचे प्रमुख दावेदार तुम्हाला लेख आवडला असल्यास तुमच्या मित्रांना पण हा लेख शेअर करा...

सबस्क्राईब करा

* indicates required