न्यूझीलंड संघाला 'किवी' संघ का म्हणतात माहितेय का? घ्या जाणून

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही संघांना त्यांच्या टोपण नावाने ओळखले जाते. त्यापैकीच एक संघ म्हणजे न्यूझीलंड संघ. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, न्यूझीलंड संघ ज्यावेळी मैदानावर खेळत असतो त्यावेळी समालोचक किवी खेळाडू आणि किवी संघ असे म्हणत असतात. तसेच ऑस्ट्रेलिया संघाला ऑसी किंवा कांगारू असे म्हणतात. तुम्हाला ही अनेकदा असा प्रश्न पडला असेल की, न्यूझीलंड संघाला किवी असे का म्हणतात? चला तर जाणून घेऊया. (Newzealand cricket team)

न्यूझीलंड संघाला किवी संघ म्हणण्यामागे एक रंजक गोष्ट आहे. जी खूप कमी लोकांना माहीत आहे. सुमार ११०० वर्षांपूर्वी न्यूझीलंड व्यंगचित्रकारांनी एक देश म्हणून न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी किवी पक्ष्यांची चित्रे वापरण्यास सुरुवात केली होती. पहिल्या महायुद्धात न्यूझीलंडच्या सैनिकांना 'किवी' असे संबोधले जात होते आणि नंतर हीच त्यांची ओळख देखील बनली. न्यूझीलंडच्या नागरिकांनी आणि सैनिकांनी देखील किवी शब्दाचा स्वीकार केला. हेच कारण आहे की, न्यूझीलंड संघाला किवी असे म्हटले जाते. केवळ क्रिकेटच नव्हे तर न्यूझीलंडच्या इतर संघांना देखील किवी संघ असे म्हटले जाते.

किवी हा न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी देखील आहे. हा असा पक्षी आहे जो गगन भरारी घेत नाही. किवी पक्ष्यामुळेच न्यूझीलंडला किवीलॅंड असे देखील म्हटले जाते. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील न्यूझीलंड संघाची ओळख किवी संघ अशी आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला कांगारू असे म्हणतात. कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. तसेच ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंना देखील कांगारू असे म्हणतात. आता समालोचक समालोचन करत असताना देखील किवी आणि कांगारू या शब्दांचा वापर करत असतात. 

किवी संघातील असा कोण खेळाडू आहे ज्याने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required