फुटबॉलचा विश्वचषक अर्जेंटीनाने जिंकला- भारतातील क्रिडाप्रेमी काय म्हणत आहेत हे वाचा !
कालची मॅच तुम्ही पाहिली असेलच ! आम्हाला क्रिकेटशिवाय दुसरं काही आवडतच नाही असं म्हणणार्या लोकांनी पण मॅच बघितली असेलच. (पण ते नाकबूल करतील हे सांगायला नकोच !) काही असो. कालच्या मॅचने एक गोष्ट आपल्याला शिकवली की शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण ताकदीने लढत रहायचं ! जगजेत्या अर्जेंटीनाने नव्या पिढीसमोर हा आदर्श निर्माण केला आहे. हो,हा धडा फक्त फुटबॉलप्रेमींसाठी नाही. कोणत्याही स्पर्धात्मक क्षेत्रात असलेल्या माणसासाठी कालचा सामना आदर्श सामना होता. या निमित्ताने अनेक लोकांनी चांगल्या पोस्ट फेसबुकवर लिहिल्या आहेत. आम्हाला आव्डलेल्या पोस्ट आम्ही शेअर करतो आहोत , कमेंटमध्ये तुमच्या पोस्ट पण टाका !
नाशिकच्या प्रविण अॅकेडमीने कालच्या सामन्याची तुलना स्पर्धा परीक्षेसोबत करताना असं म्हटलंय की
आपण अभ्यास प्रचंड करावा,
आपल स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात नावपण लिजेंड म्हणून व्हाव,
दर attempt ला सगळ्यांच्या मित्र, घरचे, नातेवाईक, जमलंच तर क्लासवाले etc.च्या अपेक्षांच ओझ्याखाली दबून जाव,
कधी मेन्समधून तर कधी मुलाखतीच्या टप्प्यातून बाहेर पडाव.
अस करत करत पार शेवटचा attempt यावा,
त्यात नेहमीप्रमाणे मुलाखतीला जाव, अन मुलाखतीत कार्यक्रम ऐनवेळी बिघडावा,
अखेर शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणली जावी आणि अंतिम निकालात थेट IAS म्हणून नाव झळकाव..
(pravin academy nashik)
संजय परदेसी म्हणतात
विजय एका दिवसाचा नसतोच मुळी..,
त्यामागे...अनेक दिवसाची खडतर मेहनत असते....!
पूर्ण करियर वाट पाहावी लागते ....
त्या विजयासाठी ...... !!
मेस्सी रिटायर होईल कदाचित ...
पण त्याची धडपड जिद्द - चिकाटी ...
नक्कीच प्रेरणादायी असेल ....
10 जर्सी नंबर असणारा ...
शेवटी #World #Cup घेऊनच जातो ..!!
#fifa_worldcup_2022 #winner
मेस्सी हा गरीब कुटुंबातील मुलगा अर्जेंटिनाच्या रोझारियो येथील या मुलाला जेव्हा ग्रोथ हार्मोनचा विकार झाला तेव्हा तो केवळ ११ वर्षांचा होता.
त्याचा उपचार खूप महाग होता.. पालकांनी त्याला स्पेनला आणले जेथे बार्का क्लबने त्याची फुटबॉल क्षमता पाहिली आणि त्याच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला...
आणि मेस्सीने फुटबॉल जगतात वर्चस्व गाजवले. त्याला कुणीतरी विचारलं होतं की तुला मॅराडोनाशी बोलायला आवडेल का...???
मेस्सी म्हणाला नाही, मी माझे विचार कोणाशीही शेअर करत नाही. मला माझा स्वतःच इतिहास बनवायची आहे....आता कळले असेल की मेस्सीचा इतिहासाच्या मागे अर्जेंटिना आणि स्पेनचा क्लब बार्का आहे आणि त्याचे पालक. उच्च कोटीची क्षमता, फुटबॉल खेळातील कौशल्य आणि नम्रता ही मेस्सी ची खासियत...
नव्या पिढीला प्रेरणा देणारे असे व्यक्तिमत्व पहिला सामना सौदी अरेबिया बरोबर हरल्या नंतर
विरोधी संघाला जाऊन हस्तांदोलन करणे आणि धैर्य देणं तसेच सौदी अरेबिया संघातील खेळाडूंना त्याने सांगितले की तुम्ही खुप छान खेळाला तुमचं भविष्य उज्ज्वल आहे.. क्रोएशिया बरोबर जेव्हा अर्जेंटिना ने सामाना जिंकला मेस्सी नेहमी प्रमाणे विरोधी संघाला जाऊन हस्तांदोलन केले आणि उद्गारला "मन छोटं करु नका लढा" ही खासियत या खेळाडूची आपलं सर्वस्व पणाला लावून आपल्या संघाला अंतिम फेरीत आणून विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले एवढेच नव्हे तर अंतिम सामना जिंकून विश्व चषक किताब आपल्या देशाला मिळवून दिला..
शाहिद शेख
कोल्हापूर
[email protected]
राहुल चव्हाण म्हणतात
डोळ्यांचं पारणं फेडणारा आणि कायम स्मरणात राहील असा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2022 चा काल रात्रीचा अंतिम सामना जबरदस्त चुरशीचा ठरला... अर्जेंटीनाच्या गोलची सुरुवात #मेस्सी नेच केली आणि अर्जेंटीनाचं जड भासणारं पारडं सेकंड हाफ मध्ये हलकं करत #एम्बाप्पे ने फ्रान्सला पटकन बरोबरीत आणलं... त्यानंतरची ही फायनल मॅच मिनिटामिनिटाला उत्कंठा वाढवणारीच होती... मेस्सीची ती शेवटची मॅच असल्याने माझ्यामधल्या मेस्सीप्रेमीला ही फायनल अर्जेंटीनानेच जिंकावी असं मनापासून वाटत होतं... मेस्सीलाच गोल्डन बाॅल देऊन सन्मानित केले गेले... गोल्डन ग्लोव्हज चा मानकरी ठरलेल्या सुपर गोलकीपर मार्टिनेझ ने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचे रोखून धरलेले दोन गोल अर्जेंटीनाला विजयाजवळ घेऊन गेले... नाही तर एरव्ही एम्बाप्पे चा जबरदस्त खेळ पाहून मी तटस्थपणे ही मॅच पाहून जिंकणाऱ्या संघाचं कौतुकच केलं असतं... फायनल मॅचमध्ये हॅटट्रिक करताना हरता हरताच चार गोल करुन जाणारा फ्रान्सचा एम्बाप्पे ह्या मॅचचा स्टार खेळाडू मला भासला... ज्याला गोल्डन बूट देऊन सन्मानित करण्यात आलं
मेस्सीने इंटरनॅशनल फुटबॉल सोडताना जसा चमकदार निरोप घ्यायला हवा होता तसाच झाला... ज्या खेळासाठी सर्वस्व अर्पिलं त्याचा निरोप घेताना मिळालेली जगज्जेतेपदाची ट्राॅफी छातीशी कवटाळून मेस्सी दिसला ते पाहून त्याचं बाळच त्याने कवेत घेतल्यासारखं मला वाटत होतं
मेस्सी आणि एम्बाप्पे ह्यांच्या खेळामुळे फायनल मॅच साजेशी अशीच झाली आणि 2022 च्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपची सांगता झाली...
सगळ्यात शेवटी एक महत्वाचा मुद्दा जो फैझान काझीने मांडाला अहे तो असा की
मेस्सी एका युगाचा अस्त आहे तर एम्बापे नव्या युगाची सुरुवात ! हा फुटबॉल विश्वचषकचा काव्यगत न्याय म्हणायला हवा.




