computer

बॉलीवूड कलाकार आणि फोबिया...या १० सेलिब्रिटीजना वाटते या विचित्र गोष्टींची भीती!!

भीती ही एक अशी भावना आहे जी लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, काळे-गोरे, श्रीमंत-गरीब असा कोणालाही भेदभाव करत नाही. खरं तर भीती ही एक भावना आहे जी प्रत्येकाला जमिनीवर आणते. प्रत्येकालाच कशा ना कशाची भीती ही वाटतेच. यासाठी फोबिया हा शब्द वापरला जातो. आपले लाडके बॉलिवूड स्टारसुद्धा यातून सुटले नाहीत. चित्रपटात मोठमोठ्या व्हीलनला एका फटक्यात मारणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यात कोणत्या गोष्टीला सगळ्यात जास्त घाबरतात? हे एकदा बघूनच घ्या.

१. दिपिका पदुकोण

बॉलीवूड डिंपल क्वीन दीपिकाला कोण घाबरवत असेल बरं? तिला Ophidiophobia नावाचा फोबिया आहे. म्हणजे वळवळणाऱ्या प्राण्यांची भीती. ती साप, अजगर यांना खूप घाबरते. तशी सापाची भीती सर्वांनाच असते पण फोबिया असल्यावर फोटो किंवा टिव्हीत पाहिल्यावरही भीती वाटणे. चित्रपटात काम करताना ती सापाचा कोणताही सिन नसेल याची काळजी घेते.

2. अर्जुन कपूर 

इशकजादे आणि गुंडे असे धाडसी अ‍ॅक्शन चित्रपट करणाऱ्या अर्जूनला कशाची भीती वाटते यावर आपण विश्वास ठेवणार नाही! त्याला पंख्यांची सर्वात जास्त भीती वाटते. त्यामुळे त्याने स्वतःच्या घरात एकही फॅन बसवलेला नाही.  याला aanemistriaphobia असे म्हणतात.

३. अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माला बाइक चालवण्याची सर्वात जास्त भिती वाटते. रब ने बनादी जोडी चित्रपटात बाईक चालवताना ती दिसते, परंतु तिच्या चेहऱ्यावरील भिती अजिबात लपली नाही. एकदा तर 'मटरु की बिजली का मंडोला' चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले होते. याला vehophobia असे म्हणतात.

४. शाहरुख खान

सुपरस्टार किंग खान याला भिती वाटते असं म्हणलं तर भल्याभल्यांना विश्वास बसणार नाही. बाजीगर, डॉन असे जिगरबाज चित्रपट करणाऱ्या शाहरुख खानला घोड्यांची सर्वात जास्त भिती आहे. आपल्या सिनेमांमध्ये तो बर्‍याचदा घोड्यावर स्वार होताना आपण पाहतो पण ही भीती त्याला आजही त्रास देते. शक्य असल्यास तो घोडेस्वारी टाळतो. याला equiinophobia असे म्हणतात.

५. अजय देवगण

अजय देवगणला खाताना घाणेरड्या हातांची प्रचंड भीती वाटते. त्याला असं वाटतं खाताना हात खरकटे झाले की त्याचा वास अजिबात जात नाही. त्याला याचा इतका फोबिया आहे की तो जवळजवळ सर्व काही खाण्यासाठी काटा, चमच्यांचा वापरतो. अगदी लाडू खायचा असेल तरीही तो चमचा मागवेल. याला mysophobia असे म्हणतात.

६. अभिषेक बच्चन

सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांना फिट राहण्यासाठी पौष्टिक आहार किती महत्वाचा असतो हे आपल्याला माहितेय. फळं ही सर्वात पौष्टीक समजली जातात. पण आपल्या ज्युनिअर बच्चनला चक्क फळांचा फोबिया आहे. तो कोणतेही फळ खात नाही म्हणे. फळं दिसल्यावर तो पळून जातो. एका रिऍलिटी शोमध्ये जेव्हा त्याने हे कबूल केले तेव्हा सर्वजण अवाक झाले होते. याला Fructophobia असे म्हणतात.

७. सलमान खान आणि सोनम कपूर

आपल्या दबंग सल्लू भाईला पाहिल्यावर कोणता फोबिया आहे असं कधीच कोणाला वाटणार नाही. पण तो घाबरतो ते बंद लिफ्टला. लिफ्टमध्ये बसून दरवाजा बंद झाल्यावर त्याला दडपण येते. शक्यतो तो पायऱ्यांनी जाणे पसंत करतो. पण पर्याय नसेल तर लिफ्टची कोपऱ्यात थांबून लिफ्ट कधी उघडेल याची तो वाट पाहतो. सोनम कपूर हिलाही हाच फोबिया आहे. तिलाही लिफ्ट म्हणलं की ताण येतो. याला  Claustrophobia असे म्हणतात.

८. रणबीर कपूर

'रॉकस्टार' रणबीर कपूर याच्या घरात सर्वाना प्रवेश असेल. पण फक्त दोन गोष्टींना तो कधीच प्रवेश देत नाही. कारण तो त्यांना प्रचंड घाबरतो. ते म्हणजे कोळी आणि झुरळे. त्याला याचा फोबिया आहे. आपण झुरळ पाहिलं की झाडू घेऊन धावतो पण रणबीर पळून जातो. याला katsaridaphobia म्हणजे झुरळाला घाबरणे आणि arachnophobia म्हणजे कोळीला घाबरणे असे म्हणतात.

९. आलिया भट

सध्याची आघाडीची अभिनेत्री आलिया भटला अंधाराची खूप भिती वाटते. अगदी झोपतानाही ती दिवे चालू ठेवून झोपते. पदडेही पूर्णपणे बंद करत नाही. याला nyctophobia असेही म्हणतात.

१०. कॅटरिना कैफ

कॅटरिना कैफचे 'जिंदगी ना मिले दोबारा' या चित्रपटात ले टोमॅटो फेस्टिव्हलचे गाणे आठवते का? ज्यात ती टोमॅटोच्या रसात पूर्णपणे भिजली आहे. पण वाचून आश्चर्य वाटेल, कॅटरिनाला टोमॅटोचाच फोबिया आहे. होय, त्यासाठी तिने एका प्रसिद्ध टोमॅटो केचअपची ब्रँड आंबसिडर होण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफरही नाकारली. जिंदगी ना मिले च्या गाण्यानंतर तिचा फोबिया अजून वाढला. याला lycopersicoaphobia असे म्हणतात.

हे कलाकार काम करताना थोडा वेळ ही भीती विसरून ते शूटिंग पूर्ण करतात. परंतु खऱ्या आयुष्यात 'डर सबको लगता है'.

 

लेखिका: शीतल दरंदळे

 

आणखी वाचा:

हे २८ रोल्स कुणी केले होते हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं नसेल...

रिलीज होऊ न शकलेले ११ हिंदी सिनेमे...यातला कोणता सिनेमा रिलीज व्हावा असं वाटतं ?

या ९ सिनेकलाकारांनी बॉलीवूडमध्ये नाव मोठं करण्यासाठी नावच बदललं !!

सबस्क्राईब करा

* indicates required