‘खेड्या मधले घर कौलारू’....'घरकुल'चा तिसरा भाग बघायला विसरू नका !!

Subscribe to Bobhata

घर हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि याच विषयावर आधारित एक नवीन मराठी वेबसिरीज आलीय ! “घरकुल” “रिव्हर्ब कट्टा” या मराठी युट्युब चॅनेलवर !

२० भागांच्या या अनोख्या वेबसिरीज मध्ये मराठी साहित्यातल्या दिग्गज लेखक आणि कवींच्या “घर” या विषयावरच्या कथा आणि कविता आपल्याला अनुभवायला मिळतील. “मानसी मागीकर” या अनुभवी आणि गुणी अभिनेत्रीची संकल्पना आणि सदरीकरण यात आपल्याला पाहायला मिळेल. मिमो प्रोडक्शन्सच्या मोहन भट आणि मिलिंद देव यांनी याची निर्मिती केली आहे.

“रिव्हर्ब कट्टा” या मराठी युट्युब चॅनेलवर आपण दररोज याचा एक भाग बघू शकाल. ही मालिका करण्यामागचं एक महत्वाचं कारण सांगताना रिव्हर्ब प्रोडक्शन्सचे अभिजित कोल्हटकर म्हणाले की – ‘युट्युब बघत लहानाची मोठी होणारी जी आजची जनरेशन आहे, त्यांनी मराठीतलं दर्जेदार साहित्य कधी वाचलंच नाहीय !! ही जनरेशन ज्या फॉरमॅट मध्ये इन्फर्मेशन सोकिंग करते, त्याच फॉरमॅट मध्ये त्यांच्या पर्यंत हा मराठी साहित्यातला खजिना पोहोचवण्याचा आमचा मुख्य हेतू आहे. वेबसिरीज आणि शॉर्ट फिल्म्स स्वरुपात उत्तम आणि दर्जेदार कलाकृती आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील.’

रिव्हर्ब कट्ट्यावर गेली २ वर्षे सातत्याने अनेक लोकप्रिय वेबसिरीज आणि शॉर्ट फिल्म्स आपण बघत आहोत. यामध्ये ‘मुव्हिंग आउट’, ‘ट्विस्ट इट’, ‘नाईट आउट’, ‘अंतर्नाद कविता’ या सारख्या विविध विषयातील वेबसिरीजचा समावेश आहे. “रिव्हर्ब कट्टा” हा एकमेव असा युट्युब चॅनेल आहे ज्यावर आपल्याला नेहमीच उत्तम आशयाच्या निखळ मनोरंजन करणाऱ्या वेबसिरीज आणि शॉर्ट फिल्म्स बघायला मिळतील. अधिक माहितीसाठी http://www.reverbproductions.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

सबस्क्राईब करा

* indicates required